18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडउद्यापासून नियमांची कडक अंमलबजावणी : डॉ. विपीन

उद्यापासून नियमांची कडक अंमलबजावणी : डॉ. विपीन

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूनंतर आता कोरोनाचा हा नवा ओमिक्रोन व्हेरिएंट अतिशय धोकादायक असून, कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेल्यानाही हा खूप हानिकारक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम अधिक कडक करण्यात आले असून, सर्व आस्थापनावरील कर्मचा-यांच्या लसीकरणाची जबाबदारी निश्चित केली आहे तर कोरोनाच्या नियमांची उद्यापासून कडक अंमलबजावणी करण्यात येवून नियमांचे उल्लंघन करणा-याकडून जबर दंड वसूल केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली.

मागच्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून, आता त्याचा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. त्यामुळे देशात केंद्र सरकारने राज्यांना हाय अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकताच कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असताना आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रोन ने मान वर काढली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली आहे.

कोरोना निबंर्धाचे सर्व नागरिक आणि आस्थापना यांनी पालन केले त्यामुळे हे शक्य झाले आहे. मात्र लसीकरणाच्या बाबतीत नांदेड जिल्हा अद्याप मागे आहे. तर आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रोन ही पसरत असल्याने शंभर टक्के लसीकरण व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या स्वाक्षरीने सदर नव्या निबंर्धाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणा-या आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक दुकानदारांनी स्वत: आपले कर्मचारी आणि ग्राहक यांचे लसीकरण झाले आहे की नाही याची खात्री करून कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. पेट्रोलपंप चालकांनी पंपावरील कर्मचारी व त्यांच्याकडे येणा-या ग्राहकांची लसीकरण झाल्याची खात्री करावी व शिस्तीचे पालन करावे लागणार आहे.

हॉटेल आणि परमिट रूम चालकांनी त्यांचे कर्मचारी व त्यांच्याकडे येणा-या ग्राहकांची लसीकरण केल्याची खात्री करावी.तर याप्रकारे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक, सेतू सुविधा केंद्र, हातगाडी, भाजीपाला, मांस विक्रेते, आठवडी बाजार विक्रेते, हमाल , माथाडी, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी संस्था आदींच्या प्रमुखांनी आपल्या येथील कर्मचारी, कार्यालयात येणारे नागरी, दुकानात येणारे ग्राहक यांची लसीकरण झाल्याची खात्री करावयाची आहे. तसेच सदरील ठिकाणी नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी असणार आहे ती म्हणजे मनपा आयुक्त, तहसीलदार, न.पा. मुख्याधिकारी यासह संबंधित कार्यालयातील विभाग प्रमुख यांची. तर नियमांचे पालन करणा-याकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे.

यात कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन करणा-याकडून ५०० रुपये, सेवा प्रदाते, संस्था यांनी आपले ग्राहक व अभ्यागत यांच्यावर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे. नियम पालन करण्यात कसूर केला तर आशा संस्था आणि अस्थापनाना १० हजार रुपये दंड, तर सेवा प्रदाते व संस्था यांनी कोविड अनुरूप वर्तन करणे अनिवार्य असून या नियमांचे उल्लंघन करणा-या संस्था आणि अस्थापनाना ५० हजार रुपयांचा दंड असणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांनी नियम पालन न केल्यास ५०० रुपये व पुरवठादार यांना ५०० रुपये दंड, बसेस च्या बाबतीत कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी १० हजार इतका दंड आकारण्यात येईल. दि. १ डिसेंबर पासून कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे सर्वानीच सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या