27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडउन्हामुळे नागरिक घामाघूम; रस्त्यावरील वर्दळ घटलीू

उन्हामुळे नागरिक घामाघूम; रस्त्यावरील वर्दळ घटलीू

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
मागच्या आठडाभरापासून जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, तापमाणात ४२.२ अंशापर्यंत वाढ झाली आहे. त्यात लोडशेडींग असल्यामुळे नागरीक चांगलेच घामाघूम झाल्याचे पाहायला मिळाले. तर उन्हाचा तडाखा जास्त असल्याने दुपारच्यावेळी वाहनांची रस्यावर वर्दळ कमी दिसून येत असून, रस्ते ओस पडत आहेत.

मागच्या हंगामात पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंनी चांगलाच कहर केला. पावळ्यात अतिवृष्टी होवून शेतक-यांचे चांगलेच नुकसान झाले. तर अनेक भागात पुर सदृश्य परीस्थिती निर्माण होवून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. तर तेवढ्याच ताकदीने हिवाळा या ऋतुने ही आपले अस्तीत्व सिद्ध करत नागरीकांना गारठायला भाग पाडले. हिवाळ्यात तापमाणाने निच्चांकी गाठत ८ अंशापर्यंत पारा घसरल्याचे पाहायला मिळाले. तर यावर्षीचा उन्हाळा ही तेवढ्याच ताकदीने आपले अस्तीत्व सिद्ध करत असून, आग ओकल्यासारखा सुर्य आग ओकत आहे.

एप्रिल महिन्याच्या तीस-या आठवड्यात तर उन्हाने कहर केला. तापमानाने उच्चांकी गाठत ४२.२ अंशापर्यंत उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली. त्यामुळे नागरीक घामाघुम झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दुपारी अचानक उन्हा पारा वाढून आगीप्रमाणे उष्णता जाणवत आहे. अन् त्यात भर म्हणजे लोडशेडींगची. ऐन दुपारी वीजेची लोडशेडींग चालु असल्याने नागरीकांना उन्हामुळे दुपारी बाहेर पडता येईना अन् वीजे नसल्याने घरात बसता येईना त्यामुळे घामाचे आकर्षश: लोट जात आहेत. तर दुपारी ग्रामीण भागासह शहरी भागातील रस्ते सामसुम पडल्याचे दिसत आहेत.

क्वचितच नागरीक दुपारच्यावेळी घराच्या बाहेर पडत असून, रस्त्यावर वाहनांची वर्दळही कमी दिसत आहे. आणखी मे महिना कडक उन्हाचा जाणे बाकी आहे. दरम्यान नागरीकांना दुपारी घराच्या बाहेर पडायचे झाल्यास डोक्याला रूमाल, पांढरे कपडे, चष्मे, टोप्या, छत्र्या आदी प्रकारच्या संरक्षणात्मक वस्तूंचा वापर करीत आहे. तर उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरीक थंडपेयांना अधिक पसंती देत असून, ऊसाचा रस, मठ्ठा, लिंबू शरबत आदी घेण्यासाठी रसवंती, थंडपेयाच्या दुकांनावर गर्दी करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या