34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeनांदेडएक खासदार, चार आमदार तरी भाजप नापास

एक खासदार, चार आमदार तरी भाजप नापास

एकमत ऑनलाईन

चारुदत्त चौधरी
नांदेड : राज्याच्या ३२ जिल्ह्यामध्ये १0६ नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून भाजपने पहिला क्रमांक कायम राखला असला तरी नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निवडणुकीत भाजप पिछाडीवर राहिला आहे. भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकर तर विधानसभेचे आ. भीमराव केराम, आ. राजेश पवार, आ. डॉ.तुषार राठोड व विधान परिषदेचे आ. राम पाटील रातोळीकर अशी टिम असतांनाही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मायक्रो रणनितीमुळे भाजप नगरपंचायत निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे आहे, एक खासदार, चार आमदार तरी भाजप नापास असे बोलल्या जात आहे.

२0१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते २0१७ मधील महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूका २0१९ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजपने आघाडी घेतली होती. आज कल नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कायम राहिला असला तरी नांदेडात मात्र नेहमी प्रमाणे अशोकराव चव्हाण यांनीच पुन्हा एकदा बाजी मारली आहे. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर दिवसेंदिवस पुढे येत आहे. खा. चिखलीकरांना एकाकी पाडण्यासाठी अनेकांनी दंड थोपाटले आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपला पराभव कसा प्राप्त होवू शकतो यासाठी भाजपने अंतर्गत रणनिती आखत ना. चव्हाणांना साथ दिल्याचे उघड झाले होते.

एक खासदार, चार आमदार असतांनाही भाजप दिवसेंदिवस जिल्ह्यात पिछाडीवर जात आहे. किनवटचे आमदार केराम आजारी असल्यामुळे निवडणुकीच्या रणनितीत समोर आले नाहीत. आ.तुषार राठोड यांच्याकडे माहूरची जबाबदारी दिली असतांना केवळ पोस्टरबाजी, बॅनरबाजीमध्ये झळकण्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला तर नायगावचे आ. राजेश पवार यांनी तर आपल्या बालबुध्दीची प्रचिती दाखवून देत कॉंग्रेसच्या पारड्यात वजन टाकले. अर्धापूरात मात्र राम पाटील रातोळीकर यांनी तब्बल एक महिना तळ ठोकल्यामुळे दोन नगरपंचायत सदस्य निवडून आल्यामुळे भाजपची लाज राखली असल्याचे सांगितल्या जात आहे. शेवटच्या तीन दिवस अगोदर खा. चिखलीकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकली असली तरी वेळेअभावी प्रचार आणि प्रसार चिखलीकरांना करता आला नाही. दिल्लीत अधिवेशन असल्यामुळे मुक्कामी राहण्याची वेळ आल्यानंतरही शेवटच्या तीन दिवसात तिन्ही मतदारसंघात प्रचार करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या हाती यश आले नाही हेही तेवढेच खरे.

कॉंग्रेसने मात्र आपल्या बाल्यकिल्ला साबीत ठेवला आहे. अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यामध्ये चव्हाणांनी आपला किल्ला राखत १0 उमेदवारांना विजयी करत नगरपंचायतवर आपले वर्चस्व निर्माण केले. तिन्ही नगरपंचायत निवडणुकीवर चव्हाणांचे बारीक लक्ष होते. प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने आ. डी.पी.सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. वसंतराव चव्हाण, किशोर स्वामी, विरेंद्रसिंघ गाडीवाले, अब्दुल सत्तार अशा दिग्गज मंडळीकडे जबाबदारी देण्यात आली होती.

जिल्हा परिषद सदस्यांसह महापालिकेचे नगरसेवकांना कामाला लावले होते. कुठल्याही परिस्थितीत तिन्ही नगरपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व रहावे यासाठी मायक्रो नियोजन करण्यात आले होते. यामध्ये नायगाव, अर्धापूरमध्ये बाजी मारली असली तरी माहूरमध्ये त्रिशंकु सत्ता येण्याचे चिन्ह दिसत आहे. राष्ट्रवादीसह आघाडी न करता सेनेला सोबत घेवून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय कॉंग्रेस घेऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. २६ जानेवारीला पालकमंत्री झेंडावंदनासाठी नांदेड येथे दाखल होणार आहेत त्या दिवशी नवीन रणनिती आखण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या