29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडएक लाखाच्या मुद्देमालासह अवैध गुटखा जप्त

एक लाखाच्या मुद्देमालासह अवैध गुटखा जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
जिल्ह्यात अवैध धंद्याना उत आला असुन सर्रास पणे अवैध दारू आणि गुटख्याची विक्र ी होत असुन पोलिसांनी दोन ठिकाणी धाडी टाकुण १ लाख ६ हजार ६०० च्या मुद्देमालासह अवैध गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागच्या काहि दिवसापासून जिल्ह्यात अवैध धंद्यानी डोकेवर काढले आहे. खुले आम प्रतिबंधीत गुटख्याची विक्री केल्या जात आहे. जिल्ह्यात शेजारील राज्यातुन चोरट्या मार्गाने गुटख्याची वाहतुक होत असते. कडक नाकाबंदी असतानाही पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक गुटखा माफिया गुटखा तस्करी करत आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागातही प्रतिबंधीत गुटखा सहज मिळत आहे. जिल्ह्यात खुलेआमपणे पाणटप-या, हॉटेल्स, किराणा दुकाण यावर गुटखा मिळतो. त्यामुळे तरूण पिढी पुर्णत: व्यसणाच्या आहारी गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी मागील दोन दिवसात दोन ठिकाणी धाडी टाकुन पोलिसांनी लाखोच्या मुद्देमालासह अवैध गुटखा जप्त केला आहे.

पहील्या घटनेत नायगाव येथील आरोपीने स्वत:च्या ताब्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा बाळगला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नायगाव शहरातील कॅनल रोडच्या बाजुस धाड टाकुन सदर आरोपीकडून १८ हजार रूपये किंमतीचा प्रतिबंधीत गूटखा व गुटखा वाहतुक करणारी एमएच २६ एझेड ४४०८ ही ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी असा एकुण ६८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुस-या घटनेत दिनांक १३ जानेवारी रोजी अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालयाद्वारे गुप्त माहितीच्या आधारे पवन गणेश राठोड रा. मांडवी ता. किनवट जि. नांदेड यांचे दुकान मे. पवन कन्फेक्शनरी अँड सुगंध सेंटर या ठिकाणी धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला ३८ हजार ६०० रूपये किंमतीचा पानमसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा असा मुद्देमाल जप्त केला. सदर दुकान पुढील आदेशपर्यंत सील करण्यात आले आहे. सदर प्रकरणी विक्रेता पवन गणेश राठोड व प्रतिबंधित अन्न पदार्थ पुरवठादार शमी अल्लाह खान, साजिद अल्लाह खान, अस्लम खान व अक्रम भाटी, सर्व राहणार आदिलाबाद यांचे विरूद्ध मांडवी पोलिस ठाण्यात गुरनं ७/ २०२२ कलम ३२८, १८८, २७२, २७३ व अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि शिवरकर हे करीत आहेत. दरम्यान मांडवी शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने एका दुकानावर धाड टाकून ते दुकान सील केल्याचे समजताच गोरखधंदा करणारे काही किराणा दुकानदारांनी कार्यवाईच्या धास्तीने दुकान बंद केल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहे

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या