मारतळा : विष्णुपुरी हुन कृष्णुर एमआयडीसी साठी जाणारी पाईप लाईन नांदेड , हैद्राबाद महामार्गालगत थातूरमातूर दुरूस्ती मुळे मंगळवारी काकांडी जवळ पाईप फुटून पाणी रसत्यावर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे पाण्या मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल आहे.
कृष्णुर एमआयडीसी मध्ये सततची पाणी टंचाई लक्षात घेऊन शासनाकडून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजने अंतर्गत विष्णूपुरी ते कृष्णुर अशी पाईप लाईन नांदेड – हैदराबाद महामार्गालगत टाकलेली आहे. ती पाईपलाईन काकांडी जवळ मंगळवारी रोजी पाईपलाईन फुटून रोडवर पाण्याचे फवारे उडून नांदेड कडे जाणा-्या वाहणास आडच होत होती.
या पाईपलाईनच्या देखभाल व दुरूस्ती साठी एका कंत्राटदारांची नियुक्ती केलेली आहे. मात्र सदर कंत्राटदार थातूरमातूर दुरूस्ती करत असल्यानेच असे प्रकार वारंवार घडत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतुन व्यक्त होत आहेत. तर दुसरीकडे या पाईप लाईनच्या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे वरिष्ठ लक्ष देतील काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.