नांदेड: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार व विभागीय कार्यशाळा वर्कशॉप येथील दुखवटा लढा विलीनीकरणामधील कर्मचार्यांनी दि. २६ जानेवारी रोजी वर्कशॉप ते मध्यवर्ती बसस्थानक दरम्यान पायी चालत बाजारपेठ मार्केट दुकानात भीक मागो आंदोलन केले. ९२ दिवसापासून संप सुरु आहे. कामगार नेते नंदू पाटील बेंद्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये शासन पुरस्कार प्राप्त गुणवंत एच. मिसलवाड, रामदास पेंडकर, एम.डी. गौस, बालाजी शिंदे, वामन मोरताटे, गोविंद हाळे, अभिषेक ताकझुरे, चंद्रकांत पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आतापर्यंत ८० कर्मचा-यांनी आर्थिक विवंचनेतून मानसिक ताण-तणावातून आत्महत्या केली आहे, तरीही एसटी प्रशासन व महाराष्ट्र शासन दखल घेत नसल्यामुळे तीन महिण्यापासून दुखवटा लढा विलीनीकरणाचा पाळत असलेल्या आंदोलक कर्मचा-यांनी वैतागून भीक मागो आंदोलन करुन, ३ हजार ५८३ रुपये एवढी जमलेली रक्कम जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत राज्याच्या सहाय्यता निधीला पाठवून निषेध व्यक्त करीत परिवहन मंत्री परब व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमची मागणी लवकर मान्य करावी अशी भूमिका भीक मागो आंदोलन करणा-या कर्मचा-यांनी केली आहे.
यावेळी शिवाजी रामगीरवार, शरद वानखेडे, साधना उकळे, आम्रपाली कांबळे, लता रेड्डी, गणेश कळसे, भगवान दुधारे, सखाराम खांदाजे, संतोष स्वामी, भरत ठाकूर, रमेश बोनलावार, भीमराव चावरे, रावसाहेब पुयड, नंदीअप्पा मठपती, संजय गायकवाड, पांडूरंग नरवाडे, विजय सुर्यतळे, विश्वनाथ भदरगे, मिलींद दवणे, शंकर हंबर्डे, मिलींद सावळे, ज्ञानेश्वर पांचाळ, नागेश अमिलकंठवार, नामदेव गोवंदे, रमेश पाटील, गोविंद मोरे, अच्युत पवळे, जगदीश पवार, नंदकिशोर गटलेवार, रमेश पाटील आदी कर्मचारी सहभागी
होते.