29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडऔरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस उशिरा सुटणार

औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस उशिरा सुटणार

एकमत ऑनलाईन

नांदेड : चीखलथाना-करमाड दरम्यान रेल्वे फाटक क्र. ५८ येथे आर.एच. गर्डर आणि आर.यु.बी. बॉक्सेस बसविण्या करिता दिनांक ८ डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी ३ तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पुढील दोन गाड्यांवर या दोन दिवशी परिणाम झाला आहे.

यात दिनांक ८ डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी गाडी संख्या १७६६१ काचीगुडा ते रोटेगाव विशेष गाडी जालना-करमाड दरम्यान ४० मिनिटे उशिरा धावेल. दिनांक ८ डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी गाडी संख्या १७६५० औरंगाबाद-हैदराबाद विशेष गाडी औरंगाबाद येथून १२५ मिनिटे उशिरा म्हणजेच तिची नियमित वेळ दुपारी १६.१५ वाजता ऐवजी सायंकाळी १८.२० वाजता सुटेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या