नांदेड : प्रतिनिधी
कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात दिवसभरात सातशेच्यावर रूग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात बुधवारी ७५८ जणांचे कोरोना अहवाल बाधित आले होते. तेच गुरूवारी प्राप्त झालेल्या २ हजार २३४ अहवालापैकी ७२० जणांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६१४ तर अँटिजेन तपासणीद्वारे १०६ अहवाल बाधित आले आहेत.
जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९६ हजार १३३ एवढी झाली असून यातील ८९ हजार ९०१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ३ हजार ५७५ रुग्ण उपचार घेत असून यात ३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे पिमप्रला हिंगोली येथील ८४ वर्षे वयाच्या महिलेचा १९ जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५७ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा ४३०, नांदेड ग्रामीण ५३, भोकर २, देगलूर २६, धर्माबाद १, कंधार २, हदगाव १, लोहा १२, मुदखेड १, मुखेड १२, नायगाव १०, हिमायतनगर ४, बिलोली १, माहूर १, अर्धापूर १२, परभणी १३, हिंगोली ८, लातूर ४, उमरखेड १, हैद्राबाद ५, जालना १, जळगाव १, आदिलाबाद ३, औरंगाबाद २, केरळ १, नाशिक १, निजामाबाद २, उस्मानाबाद १, कर्नाटक १, तेलंगणा २ तर अँटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा १८, नांदेड ग्रामीण २, बिलोली २४, धमार्बाद २८, हदगाव ३, लोहा १, माहूर ५, मुखेड ६, नायगाव १०, उमरी ९ असे एकूण ७२० कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ९, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण ४६३, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५०, खाजगी रुग्णालय ३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड २ असे एकुण ५२७ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी २८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ७, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ७०८, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण २ हजार ८०७, हदगाव कोविड रुग्णालय १, खाजगी रुग्णालय २२, बिलोली कोविड रुग्णालय २ असे एकुण ३ हजार ५७५ व्यक्ती उपचार घेत आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५१ टक्के एवढे झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.