18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडकोरोनाच्या सात रुग्णांची भर

कोरोनाच्या सात रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना विषाणूने काहीशी उसळी घेतली असून रविवारी आलेल्या अहवालात नवीन ७ नवीन रुग्णांची भर पडली आहे.तर उपचार घेणा-या रुग्णांची संख्या २५ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे.

गेल्या दोन महिन्यात कोरोनाच्या रूग्ण वाढती गती अंत्यत कमी झाली आहे.यामुळे रूग्ण संख्या घटली आहे.मात्र रविवारी नव्या रूग्णांनी उसळी घेततली आहे. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.मात्र ७ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर नांदेड मनपा गृह विलगीकरण ३ रुग्णांला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७ हजार ८०७ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के झाले आहे.

रविवारच्या अहवालात ६१० अहवालांमध्ये ६०३ निगेटिव्ह आणि ०७ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०४८५ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०७ आणि अँटीजेन तपासणीत ०० असे एकूण ०७ रुग्ण नवीन सापडले आहेत. स्वॅब तपासणी अहवाल निरंक असून नाकारण्यात आलेले स्वॅब ५ आहेत. सापडलेले नवीन रुग्ण नांदेड मनपा ६ व उमरखेड १, आहेत. कोरोनाचे २५ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण २१,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी ३, खाजगी रुग्णालयात- १,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात १ रुग्ण आह.े

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या