23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडखंडणीबहाद्दर पुरुषोत्तमला तीन दिवसाची पोलीस कोठडी

खंडणीबहाद्दर पुरुषोत्तमला तीन दिवसाची पोलीस कोठडी

एकमत ऑनलाईन

नांदेड : विशेष प्रतिनिधी
नांदेड येथील बिल्डर श्याम गुप्ता व त्यांचे भागीदार कौस्तुभ फरांदे यांना एका पत्राद्वारे एक कोटीची खंडणी मागणा-या पुरुषोत्तम मांगुळकरला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.व्ही. कुळकर्णी यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

श्याम गुप्ता यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र आले होते. त्यामध्ये श्याम गुप्ता आपण भाग्यनगरमध्ये दुस-यांच्या जागेवर विनाकागदपत्रे बांधकाम करीत आहात. आपल्या सोबतचे भागीदार कौस्तुभ फरांदे यांनाही समजावून सांगा. नाहीतर पहा, तसेच तुम्हाला पंधरा दिवसाची संधी देत आहे. आपण एक कोटी रुपये दिले नाही तर आई-बहिणी, भावजी आणि दोन मुले यांना जीवानिशी मारण्यात येईल, अशा अर्थाचे लिखाण करून श्याम गुप्ता यांच्याकडे शासकीय डाक खात्यामार्फत पाठविण्यात आले. तसेच आपण आपल्या सावत्रभावाला देखील याची कल्पना देऊ नये, असेही धमकावण्यात आले होते. या पत्रामुळे गुप्ता – फरांदे परिवार चांगलेच घाबरून गेले होते. सदरील खबर गुप्ता परिवाराने पोलीस अधीक्षकांना सांगताच पोलीस अधीक्षकाने तत्काळ याची दखल घेऊन त्यांचे समुपदेशन करून सदरील खंडणीबहाद्दर हा गुंड नसून आपल्यातील कोणीतरी असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज काढला. तो अंदाज खरा ठरला. पुरुषोत्तम मांगुळकर हा गुप्ता परिवाराचा नातेवाईक असल्याचे सिद्ध झाले.

पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने याबाबत सविस्तर तपासणी केली. तपास पूर्ण करून सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्याम गुप्ता यांना धमकीचे पत्र पाठवणारा पुरुषोत्तम मांगुळकर, रा.हिमायतनगर यास अटक करण्यात आली. २२ एप्रिल रोजी न्यायालयासमोर पुरुषोत्तमला हजर केले असता पुढील तपासासाठी पुरुषोत्तम याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी न्यायाधीशांना सांगितले. न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करून पुरुषोत्तमला २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या