29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeनांदेडगटशिक्षणाधिकारी यांच्याहस्ते सायकल वाटप

गटशिक्षणाधिकारी यांच्याहस्ते सायकल वाटप

एकमत ऑनलाईन

किनवट: प्रतिनिधी
येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत मानव विकास कार्यक्रमातर्गत इयत्ता ८ वी मध्ये शिकणा-या ४३ विद्यार्थिनींना गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने याच्यांहस्ते सायकल वाटप करण्यात आल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना गरशिक्षणधिकारी बने म्हणाले की, मानव विकास योजनेतुन सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, ये-जा करण्यास सोयीचे होईल, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, चांगले यश संपादन करावे असे ते म्हणाले.

यावेळी संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक कृष्णकुमार नेम्मानीवार, अनिल महामुने , संजय कराड, शंकर राठोड, उत्तम कानिंदे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक संजय चव्हाण, रेणुकादास पोहरकर, सुनिल पाठक , प्रमोद राहाटे, आजेगावकर, श्रीकांत गुट्टे, चंदन एंडलवार, सुनिल मुंडे आदी सह शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या