27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeनांदेडघारापुरी येथे महिला शेतकरी मेळावा संपन्न

घारापुरी येथे महिला शेतकरी मेळावा संपन्न

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर: तालुक्यातील मौजे घारापुर येथे सेवा संस्था आणि कॉटन कनेक्शन साउथ आशिया व पीएससीपी प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 नोव्हेंबर रोजी महिला शेतकरी मेळावा आयोजित करून उपस्थित २७ गावच्या २०० महिला शेतक-यांना शाश्वत शेती व कॉटन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांना किनवट येथील उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर साहेब यांनी शेती विषयक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आलेले किनवट येथील उपविभागीय कृषी अधिकारी व हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब, देविकांत देशमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ पोखरणी, श्री समर्थ बोरगावे, गौतम पाटील सह आदी जर उपस्थित होते ग्रामीण भागातील शेतक-यांना शाश्वत शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक २८ नोव्हेंबर रोजी शहरातील ढगे फार्म हाऊसचे प्रगतिशील शेतकरी गणपतराव ढगे यांच्या शेतामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्राध्यापक सदानंद ढगे, डॉ. ढगे हे उपस्थित होते .

यावेळी बोलताना कॉटन कनेक्टचे भागवत कालुरकर, विकास चव्हाण सेवा संस्थेचे राज्य समन्वयक पंकज देशमुख, बाळू दीदी निरंजन दीदी व डॉक्टर परभणीकर यांनी उपस्थित महिला शेतक-यांनाअनमोल असे मार्गदर्शन केले व तसेच शाश्वत शेतीचे डेमो प्लांटचे मॉडेल कसे तयार करून आपला प्लॉट कसा असावा याबद्दल उपस्थित शेतक-यांना माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या