26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeनांदेडचाकूचा धाक दाखवून दुचाकी पळवली

चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळवली

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून जबरी चोरी, घरफोरी, लुटमार अशा घटनात वाढ झाली असून, शहराजळील नवीन हसापूर टी़पॉईंट जवळून एका दुचाकी स्वारास अडवून, चाकूचा धाक दाखवून दुचाकी जबरी पळवून नेल्याची घटना दि़२१ जूनच्या रात्री घडली़ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागच्या काही दिवसापासून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे़ दररोज घरफोडी, लुटमार, दरोडा अशा घटना घडत आहेत़ पोलिसांची चोरट्यावर वचक राहीली नसून चोरटे अगदी बिनदास्तपणे चो-या करत फिरत आहेत़ दरम्यान शहराजवळी नवीन हसापूर पुला जवळील टी-पॉईंट जवळ अज्ञात चार चोरट्यांनी बालाजी शामराव जाधव रा़वडगाव ता़लोहा हे आपली दुचाकी क्रमांक एमएच २६ एएम ७०२८ हि २५ हजार रूपये किंमतीची गाडी रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत जबरी चोरून नेली़ या प्रकरणी बालाजी जाधव यांच्या फिर्यादीवरून लिंबगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि पवार हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या