26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeनांदेडजिल्हाधिकारी पाटील यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार

जिल्हाधिकारी पाटील यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार

एकमत ऑनलाईन

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील काटकळंबा गावचे सुपुत्र तेलंगणा राज्यामध्ये नलगोंडा येथे जिल्हाधिकारी कार्यरत असलेले प्रशांत जीवनराव पाटील यांना राज्य निवडणूक आयोगाने उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी हे पुरस्कार जाहीर केले जातात.

राज्यातील निवडणुकीचे काम केलेले सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी त्याच्या कामकाजाप्रती दिलेले योगदान विचारात घेऊन या निवडणुकीसाठी प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणुक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांना पुरस्कार जाहीर केले जातात. नलगोंडा जिल्ह्यात निवडणुकीचे संचलन तसेच आदर्श आचारसंहितेचे संदर्भात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्य निवडणुक आयोगाकडुन नलगोंडा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ठ अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे अशी भावना व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या