26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeनांदेडजिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; नागरीक मात्र बिनदास्त

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; नागरीक मात्र बिनदास्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. दिवसभरात सातशे ते साडे सातशे रूग्णांची भर पडत आहे. कोरोना रूग्णांचे हे आकडे भेडसावणारे जरी असले तरी नागरीकांत मात्र जराही भीतीचे वातारण राहिले नाही, नागरीक अगदी बिनदास्त पणे बाजारपेठे विनामास्क फिरत असल्याचे दिसुन येत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

गत दोन वर्षापासुन संपुर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येवुन गेल्या असुन, मागच्या चार ते पाच महिन्यात रूग्ण संख्या चांगली घटली होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेले कडक निर्बंध शिथील करत नागरीकांना थोडी सण, उत्सव साजरे करण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र सध्या कोरोनाची तीसरी लाटही येण्यास सुरूवात झाली आहे. मागील पंधरादिवसापासुन जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्या अचानक झपाट्याने वाढू लागली आहे. पंधरा ते वीस दिवसापुर्वी दिवसभरात एक ते दोन रूग्ण बाधित निघत होते तेच आजरोजी सातशे ते साडेसातशे निघत आहेत. त्यामुळे ही रूग्णांची ही वाढती संख्या निश्चित धडकी भरणारी आहे. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासुन जिल्ह्यात कडक निर्बंत लागु करण्यात आल्याचे जाहिर केले. त्यानुसार जमावबंदी, संचारबंदी लागु करून सार्वजनिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, लग्नसंमारंभ आदी ठिकाणी नागरीकांच्या उपस्थितींची संख्या निश्चित करून अनावश्यक गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असतानाही नारीकांकडून ना या नव्या नियमांचे पालन होत आहे ना प्रशासनाकडून याची कडकपणे अंमलबजावणी होत आहे.

त्यामुळे रूग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरीक तर अगदी बिनदास्तपणे बाजापेठेत विना मास्क आणि कुठलेही सोशल डिस्टंन्सींगचे पालन न करता फिरताना दिसत आहेत. शहरातील वजिराबाद, तरोडा, जुना मोंढा, श्रीनगर आदी भागात सायंकाळच्या दरम्यान खरेदीसाठी नागरीक मोठी गर्दी करीत आहेत. दरम्यान वाढती कोरोनाची रूग्णसंख्या लक्षात घेता सुजाण नागरीकांनी विनाकारण बाहेर न फिरता, कोरोनाच्या नियंमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य केले तर निश्चित कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होणार आहे. कोरोनाचे नियम मोडणा-या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे परंतु बाजारपेठेत दररोज मोठी गर्दी दिसून येत आहे. यामुळे हे पथक नावालाच दिसून येत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या