29.2 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeनांदेडजिल्ह्यात पुन्हा ७१९ कोरोना बाधित वाढले

जिल्ह्यात पुन्हा ७१९ कोरोना बाधित वाढले

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रूग्ण संख्या घटण्याचे नाव नाही. आतापर्यंत महापालिका हद्दीत केवळ ७० नागरीकांनी लसीचा पहीला डोस घेतला आहे. लसीकरण वेगाने होत असले रूग्ण झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या १ हजार ९६० अहवालापैकी ७१९ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ५९२ तर अँटिजेन तपासणीद्वारे १२७ अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरीकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९६ हजार ८५२ एवढी झाली असून यातील ९० हजार ३८२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ३ हजार ८१२ रुग्ण उपचार घेत असून यात ३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील ७३ वर्षे वयाच्या महिलेचा २० जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५८ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा ३३५, नांदेड ग्रामीण ३९, भोकर २, देगलूर ३, धमार्बाद १, कंधार २, हदगाव ३, किनवट ७२, लोहा ३, मुदखेड १, मुखेड १९, नायगाव १, हिमायतनगर ३, बिलोली ५, उमरी ४०, अधार्पूर ५, माहूर 3, हिंगोली ५, परभणी २९, अकोला १, हैदराबाद १, निझामाबाद १, औरंगाबाद 3, लातूर १, जालना १, नागपूर १, वाशीम ६, यवतमाळ २, पुसद १, उमरखेड २, अहमदनगर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा १७, नांदेड ग्रामीण ४, बिलोली १६, धमार्बाद १७, हदगाव ६, लोहा ३, देगलूर २८, मुखेड ३, नायगाव ६, उमरी ५, भोकर २, कंधार १३, मुदखेड ७ असे एकुण ७१९ कोरोना बाधित आढळले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या