23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeनांदेडजिल्ह्यात ११ ठिकाणी धाड; २६ हजाराचे मद्य जप्त

जिल्ह्यात ११ ठिकाणी धाड; २६ हजाराचे मद्य जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीस बंदी असताना पोलिसांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठाण्याच्या हद्दीत जवळपास ११ ठिकाणी धाड टाकून देशी व विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात येत असलेल्या प्रेसनोटमध्ये जप्त करण्यात आलेले मद्य २६ हजाराचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गुरुवारी (दि.१४) रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख व कडेकोट बंदोबस्त होता. या उत्सवाच्या काळात मद्यविक्रीस बंदी होती. असे असतानाही पोलिसांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा जप्त केला आहे. नांदेड शहरातील विमानतळ, शिवाजीनगर, नांदेड ग्रामीण, वजिराबाद व इतवारा या हद्दीतून बेकायदेशीररित्या दारू विकणा-यांवर कारवाई करत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मद्य जप्त केले आहे. तसेच अर्धापूर, किनवट व उमरी या तालुक्यातही विविध ठिकाणी धाडी टाकून मद्य जप्त केल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देशी – विदेशी अशी एकूण ५५२० रुपयाची दारू जप्त करण्यात आली. तर अर्धापूर २८८०, किनवट-८५८० रुपये, शिवाजीनगर १६२०, नांदेड ग्रामीण १२०० रुपये, वजिराबाद ३७८०, इतवारा – १२०० तर उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १३८० रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच विनापरवाना दारुची विक्री करणा-या काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा जप्त केल्यानंतरही केवळ कारवाईची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी या घटनेची नोंद घेतली की काय, असा सवाल करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या