26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडटाकळी ग्रामपंचायतीची आरक्षण प्रभाग रचना जाहीर

टाकळी ग्रामपंचायतीची आरक्षण प्रभाग रचना जाहीर

एकमत ऑनलाईन

माहूर : माहूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला वेग आला असून, सोमवार, दि. ६ जून रोजी माहूर तालुक्यातील टाकळी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करूण टाकळी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासक डी.के. हेडगे व व्ही.एन. जाधव यांनी आरक्षण जाहीर केले.

२०११ च्या जनगणनेनुसार टाकळी येथील मतदान १,२५३ इतके असून, प्रभागा मध्ये संख्येनुसार त्यांना विभाजित करण्यात आले. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणा संदर्भात हरकत नोंदविण्यासाठी १४ जूनपर्यत मुदत देण्यात आली आहे.

यावेळी माजी उपसरपंच लक्ष्मण घुले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष फयाज फारुकी, शंकर पाटील, विठ्ठलराव अडकिने, सुभाष पाटील, सुरेशराव मोदळकर, मारोती तिडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या