23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडदेवाला नमस्कार करून चोरट्याने मंदिराची दानपेटी फोडली

देवाला नमस्कार करून चोरट्याने मंदिराची दानपेटी फोडली

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
रामनवमीनिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त असतांनाही चोरटयांनी मंदिरातील दानपेटी फोडली. देवाला नमस्कार करून दानपेटी फोडल्याची घटना रविवारी पहाटे दयानंदनगर भागातील दत्त मंदिरात घडली.चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.

काही दिवसापुर्वी बांधकाम व्यवसायीकांची हत्या आणि रविविरी साजरी होत असलेला रामनवमीचा सण या पार्श्वभूमिवर शहरासह प्रत्ये गल्लीत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.मात्र असे असूनही चोरटयांनी नव्या मोंढयालगत असलेल्या दयानंद नगरातील मंदिरात रविवारी पहाटे चोरी करून दानपेटीत असणारे जवळपास एक लाख रुपये चोरटयांनी पळवले असे मंदिराच्या पुजा-याने सांगितले.

चोरीच्या या घटनेत दोन जण सीसीटीव्ही कॅमे-यात दिसत असून सुरुवातीला यातील एकाने मंदिराच्या बाहेरून देवाला हात जोडून नमस्कार केला.यानंतर मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभा-यात शिरून त्यांनी दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरली. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी पुजा-यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या