नांदेड : शहरातील फारुख नगर भागात पाच जणांनी दारू पिण्यास पैसे देण्यास नकार देणा-या एका २३ वर्षीय तरूणावर चाकूने अनेक वार करत रक्ताने धुळवड साजरी केली. या जखमी तरूणावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरातील फारुख नगर भागातून मंगळवारी दुपारी ४ वाजेदरम्यान गणेश राजराम हिवराळे (२३) या युवक आपल्या आईला आणण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. तेव्हा रस्त्यात पाच जणांनी अडवून त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली.
पैसे देण्यास नकार देताच या पाच जणांनी गणेशच्या मानेवर,पोटात दोन जागी पाठीत असे जवळपास ७ ते ८ वार करून ते तीन हल्लेखोर पळून गेले. या घटनेमुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
या घटनेची माहिती मिळाल्याने गणेश यास घरच्या नातेवाईकांनी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकरणी संतोष उर्फ संत्या वाघमारे, प्रभाकर शंकर हंबर्डे, अविनाश भारत, अनिल रामराव हंबर्डे व मोन्या ठाकूर या पाच जणांविरूद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सपोनि विजय जाधव हे करीत आहेत.