18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडनगरपरिषद निवडणुकांवर ‘प्रिन्स’ची करडी नजर

नगरपरिषद निवडणुकांवर ‘प्रिन्स’ची करडी नजर

एकमत ऑनलाईन

नांदेड: विशेष प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील ११ नगरपालिका, १0 पंचायत समित्या व नगर पंचायतीमध्ये कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याच्या अनुषंगाने कॉंग्रेसची चाचपणी सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी जिल्हाध्यक्षांना आदेश पारित करीत स्पष्टपणे सूचना दिल्या की सर्व जागांसाठी उमेदवार तयार ठेवा. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना अध्यापही अंधातरीत आहेत. नायगाव, माहूर, अर्धापूर या तिन्ही नगरपरिषद निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरेपर्यंत महाआघाडी झाली नाही. त्यामुळे भविष्यात कुठलीही गडबड होवू नये यासाठी नांदेड जिल्ह्याच्या प्रिन्सने नगर परिषद निवडणुकीवर करडी नजर ठेवली असल्याचे सांगितल्या जात आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अनेक ठिकाणी कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी यांना सोबत घेवून सत्ता स्थापन केली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात नेहमीच कॉंग्रेसचे वर्चस्व सिध्द झाले आहे.

जिल्ह्यात कॉंग्रेसचे पाच आमदार असून अनेक नगरपंचायती, नगरपालिका, पंचायत समितीवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे भविष्यातही कॉंग्रेसची एकला चलो रे ची भूमिका निभावते की काय अशी शासंकता निर्माण झाली आहे. कॉंग्रेसची स्वबळाची चाचपणी झाली असून यामध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेचे वर्चस्व सिध्द होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून वर्तविले जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघापैकी ४ विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. भोकरमधून दस्तूरखुद अशोकराव चव्हाण, हदगाव माधवराव पाटील जवळगावकर, नांदेड दक्षिण मोहन हंबर्डे तर नव्यानेच निवडून आलेले देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आ. जिदेश अंतापूरकर तर विधान परिषदेचे आ. अमरनाथ राजूरकर असे एकंदरीत पाच कॉंग्रेसचे आमदार या जिल्ह्याला लाभले आहेत. महापालिकेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे तर जिल्हा परिषदेत ६३ पैकी कॉंग्रेसचे २८ सदस्य आहेत. राष्ट्रवादीच्या १0 सदस्यांना सोबत घेवून जिल्हा परिषदेमध्ये आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेनाही त्यांच्यासोबत असून सेनेचे १0 सदस्य आजघडीला कॉंग्रेस सोबत असल्याचे आजघडीला सांगितल्या जात आहे. माहूर, नायगाव, अर्धापूर या तीन नगरपरिषदेच्या निवडणूका २१ डिसेंबर रोजी होणार असून यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूरसाठी महापालिका स्थायी सभापती किशोर स्वामी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे तर माहूर नगर पंचायत निवडणूक प्रमुख म्हणून कॉंग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर नायगाव नगर परिषदेसाठी कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर या तिघांवर प्रमुख जबाबदारी देत आ. राजूरकर व डी.पी.सावंत यांच्याकडे समन्वयकाची जबादारी देण्यात आल्याचे कळते. या तिन्ही ठिकाणी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व महापालिका नगरसेवक देगलूर पोटनिवडणुकीनंतर कामाला लागले आहेत. देगलूर पोटनिवडणुकीमध्ये महाआघाडीचा उमेदवार आला असल्याचे सांगत असले तरी यासाठी सर्वस्व पालकमंत्र्यांनी पणाला लावले होते त्यामुळे हा विजय मोठ्या फरकाने पहावयास मिळाला. नगर परिषदेच्या निवडणुकीत अद्यापतरी महाआघाडी झाली नाही. राष्ट्रवादी-सेना एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात
आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या