23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडनांदेडचा पालकमंत्रीही भाजपचा होईल : खा. चिखलीकर

नांदेडचा पालकमंत्रीही भाजपचा होईल : खा. चिखलीकर

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरी बसविले असून आता नांदेडचा पालकमंत्रीही भाजपचा होईल असा विश्वास खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला. तर गेल्या अडीच वर्षात शहराचा विकास करता आली. त्यामुळे केवळ महापालिका निवडणुका डोळयासमोर ठेवून शहरात खड्डे खोदण्याचे काम करण्यात येत आहे अशी टिका कॉगे्रस नेतृत्वावर केली.

राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंर मुुंबई येथून खा. चिखलीकर यांचे रविवारी सकाळी नांदेडात आगमन झाले़ यावेळी भाजपाकडून स्वागत रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला.

यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, किशोर देशमुख, प्रदेश सदस्या प्रणिता देवरे, प्रविण साले, विजय गभीरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. चिखलीकर म्हणाले की, या अगोदर मुख्यमंत्री पदासाठी अनेकांनी अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसला. परंतू देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून एकताथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रं दिली आहेत.

भाजप हा शिस्तीचा पक्ष असून आम्ही शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत, हे यातून दाखवून दिले आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात सत्ता आणि अशोकराव चव्हाण हे पालकमंत्री असूनही नांदेड शहराचा विकास करता आला नाही. आघाडी सरकार पडणार याची माहिती असल्याने आणि होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका डोळयापुढे ठेवून शहरातील रस्ते खोदुन खड्डे करण्यात आले आहेत.

ही लोकांच्या डोळयात धुळफेक आहे. येत्या काही दिवसात नांदेडाचा पालकमंत्री भाजपचा होईल़ याबाबत पक्ष निर्णय घेईल, हा निर्णय झाल्यास नांदेडच्या विकासाला गती येईल असे सांगीतले़ तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील निर्णयावर ते म्हणाले की, पालकमंत्री चव्हाण यांनी घाईघाईने ही बैठक घेऊन पैसे नसतांना ही खर्चास मान्यता दिली़ नाशिक येथेही छगन भुजबळ यांनी अशी बैठक घेतली होती़ तक्रारीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या निर्णयास स्थगिती दिली आहे़ या धर्तीवर नांदेडच्या बैठकीची तक्रार करण्यात येईल असे स्पष्ट केले़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या