26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeनांदेडनांदेडच्या अथर्वची पुण्यात भरारी

नांदेडच्या अथर्वची पुण्यात भरारी

एकमत ऑनलाईन

नांदेड : विशेष प्रतिनिधी
नांदेडचे भूमिपुत्र तत्कालीन विभागीय आयुक्त तथा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांचे चिरंजीव अथर्व दिपक म्हैसेकर यांनी पुण्यामध्ये एडीएम एजयुबोर्ड कन्सल्टंटस या नव्या स्टार्टअपची सुरुवात केल्यामुळे नांदेडच्या अथर्वने पुण्यात घेतली भरारी असे बोलल्या जात आहे.

सर्व विद्याशाखेतील मुलांच्या परदेशातील पदव्यूत्तर शिक्षणासाठी लागणा-या प्रत्येक आवश्यक बाबीमध्ये मदत करण्याच्या उददेशाने हे सेवाकेंद्र सुरु करण्यात आले आहे. पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोरील लोकमत भवन संकुलात या सेवेचा आरंभ करण्यात आला आहे.

येथे अमेरिकेपासून ते युरोप खंडातील सा-या देशामधील शैक्षणिक संधीविषयी परिपूर्ण माहिती दिली जाणार आहे. परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना विद्यापीठ निवड, प्रवेश प्रक्रियेबाबत आर्थिक सहाय्य कसे उपलब्ध होवू शकते त्या विषयाच्या मार्गदर्शनासह, व्हीसा, योग्य अभ्यासक्रम अशा सर्व अनुषंगीक बाबींवर नेमका सल्ला देण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेचे संचालक अथर्व दिपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या