28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeनांदेडनांदेड जिल्‍हा परिषदेला तीन राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार

नांदेड जिल्‍हा परिषदेला तीन राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
महा आवास अभियानांतर्गत सन २०२०-२१ या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल नांदेड जिल्‍हा परिषदेला तीन पुरस्कार मिळाले आहेत. दि. २२ एप्रिल रोजी ग्राम विकास मंत्रालयाने या पुरस्‍काराची घोषणा केली असून मुंबई येथे पुरस्‍काराचे वितरण होणार आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर व जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संजय तुबाकले यांना पुरस्‍कार स्विकारण्‍यासाठी निमंत्रित करण्‍यात आले आहे.

सन २०२०-२१ या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्‍यासाठी राज्‍यात महा आवास अभियान राबविण्‍यात आले होते. या अभियानात जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्‍हा व तालुकास्‍तरावर बैठका घेवून तसेच प्रत्‍यक्ष गावस्‍तरावर कामांची पाहणी करुन घरकुल पूर्ण करण्‍यासाठी पाठपुरावा केला. या अभियान कालावधीत राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमात घरकुलांच्‍या उद्दिष्‍टांप्रमाणे मंजूरी देणे या उपक्रमात नांदेड जिल्‍हा परिषदेला व्दितीय क्रमांक मिळाला आहे. मुलभूत नागरी सुविधा देवून आदर्श घरांची निर्मिती उपक्रमात तृतीय तर लाभार्थ्‍यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्‍थांचे कर्ज मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेला व्दितीय पुरस्‍कार मिळाला आहे. आवास योजनेतील नांदेड जिल्‍हा परिषदेला तीन पुरस्‍कार घोषित करण्‍यात आले आहेत.

जिल्‍हयातील ग्रामीण भागात आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यात आली आहे. २० नोव्‍हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत नांदेड जिल्‍हयातील ग्रामीण भागातून प्रधानमंत्री आवास योजनेत २१ हजार ५९४, रमाई आवास ६ हजार ३४, शबरी आवास ७१०, पारधी आवास ४५ तर आदिम कोलाम आवास योजनेत ६२ असे एकूण २८ हजार ४४२ घरकुलांचे बांधण्‍यात करण्‍यात आले आहे. दरम्‍यान जिल्‍हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्‍हाण यांच्‍या उपस्थितीत लाभार्थ्‍यांना घरकुलांच्‍या चाव्‍यांचे वितरण करण्‍यात आले होते. घरकुल कामात जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, गट विकास अधिकारी, विस्‍तार अधिकारी, ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींचा सहभाग व सहकायार्ने आवास योजनेत उत्‍कृष्‍ट कामगिरी केल्‍यामुळेच नांदेड जिल्‍हा परिषदेला राज्‍यस्‍तरीय तीन पुरस्‍कार मिळू शकले, अशी प्रतिक्रिया मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या