नांदेड : जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या २ हजार १२ अहवालापैकी ७८६ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६४८ तर अँटिजेन तपासणीद्वारे १३८ अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९८ हजार ४९५ एवढी झाली असून यातील ९१ हजार ५०८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
आजच्या घडीला ४ हजार ३२९ रुग्ण उपचार घेत असून यात ३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५८ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा ३९२, नांदेड ग्रामीण ४९, भोकर ७, देगलूर २५, धमार्बाद २, कंधार ५, हदगाव १०, किनवट ३६, लोहा ३, मुदखेड २०, मुखेड १३, उमरी १६, माहूर ३५, हिंगोली ८, परभणी १९, अकोला १, निझामाबाद २, लातूर १, नागपुर २,हैद्राबाद ४, तेलंगना १,पुणे,१ यवतमाळ २ वाशीम १, उमरखेड १, राजस्थान २, औरंगाबाद ३ असे रूग्ण आढळले.