29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडनांदेड परिमंडळातील ६९५ लाभार्थांचा समावेश

नांदेड परिमंडळातील ६९५ लाभार्थांचा समावेश

एकमत ऑनलाईन

नांदेड :प्रतिनिधी
घरगुती वीजजोडणी नसलेल्या अनुसूचित जाती व जमाती प्रवगार्तील नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरु असून राज्यात आतापर्यंत ११ हजार ३६३ नवीन घरगुती वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नांदेड परिमंडळातील ६९५ लाभार्थांचा समावेश आहे.

राज्याचे ऊजार्मंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून दि. १४ एप्रिल २०२१ पासून ही योजना सुरू करण्यात आली. गेल्या ९ महिन्याच्या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गार्तील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरु करण्यात आली आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी सुरु आहे. राज्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करीत महावितरणकडून अनुसूचित जातीमधील ७ हजार ४३९ आणि जमातीमधील ३ हाजर ९२४ अशा एकूण ११ हजार ३६३ नवीन घरगुती वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. नागपूर प्रादेशिक विभागात सर्वाधिक ४ हजार १०६, कोकण प्रादेशिक विभाग- २ हजार ८९९, औरंगाबाद प्रादेशिक विभागझ्र २ हजार ६४१ आणि पुणे प्रादेशिक विभागात १ हजार ७१७ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये नांदेड परिमंडळांतर्गत येणा-या नांदेड जिल्हयात २५९ वीजजोडण्या देण्यात आल्या तसेच परभणी जिल्हयात २११ त्याचबरोबर हिंगोली जिल्हयात २२५ वीजजोडण्यांचा समावेश आहे. तर सद्यस्थितीत राज्यातील १ हजार ६९१ वीजजोडण्या देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता, वीजजोडणीच्या जागेची तांत्रिक तपासणी, विद्युत संच मांडणीचा चाचणी अहवाल, विद्युत पायाभूत सुविधा उभारणी आदींबाबत कार्यवाही सुरु आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना घरगुती वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. या वीजजोडणीसाठी महावितरणकडे केवळ ५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजजोडणीचा अर्ज महावितरणकडून मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या