22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeनांदेडनागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे:डॉ.शिंदे

नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे:डॉ.शिंदे

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
कोरोना आणि डेल्टा विषाणू पेक्षा ओमीक्रॉन हा विषाणू अतिशय घातक आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहिर केले आहे. त्यामुळे या विषाणूबद्दल काळजी व्यक्त केली आहे. खूप भयावह विषाणू म्हणून यास शास्त्रज्ञ सांगत असून अनियंत्रीत वावरणा-या नागरिकांनी आता आपल्या वागण्यावर नियंत्रण राखायला हवे. ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे लस न घेणा-यांनी तत्काळ लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केले आहे.

दक्षिण आफ्रिकेत नवीन व्हेरिएंट ओमीक्रॉन समोर आल्याने जगभरात चिंता वाढली आहे. भारतात कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात ओमीक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक पावले उचलण्याबाबत प्रशासन जागृत झालेले आहे. वेगाने फैलाव होणा-या या व्हेरिएंटपासून मुक्त राहण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या व्यक्तींचे लसीकरणाचे डोस शिल्लक आहेत त्यांनी लसीकरण करून घेत या ओमीक्रॉनचा सामना करण्यासाठी शरिरात प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची गरज आहे. दरम्यान तिसरी लाट रोखता यावी यासाठी हर घर दस्तक व जनजागृतीच्या माध्यमातून घरोघरी आरोग्य यंत्रणा पोहोचत आहे.

आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने जिल्ह्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जाणार आहे. ज्या व्यक्तीला लक्षणे आहेत किंवा कसे, तसेच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र तपासले जाणार आहे.ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सावध राहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तसेच नियमित मास्कचा वापर, वारंवार हात स्वच्छ धुणे व दोन व्यक्तीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर अशा गोष्टींचे पालन करण्याची गरज आहे. तसेच या पाठोपाठ कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेऊन स्वत: सुरक्षीत राहावे.असे आवाहन डॉ.बालाजी शिंदे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या