भोकर:प्रतिनिधी
पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाणांच्या परिश्रमामुळे भोकर तालुक्तयात विकास कामांना गती मिळाली आहे. आज दि.२२ जानेवारी रोजी ग्रामीण भागातील रस्ते विकास आणि शासकीय इमारतींच्या २०.२१ कोटिंच्या कामाचा शुभारंभ ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
पालकमंत्री तथा बांधकामंत्री अशोकराव चव्हाण भोकर तालुक्याच्या विकासासाठी सढळ हस्ते शासन निधी उपलब्ध करुन दिला आहे त्यातुन शहरातील तसेच तालुक्यातील रस्ते विकासासह तालुक्यातील शासकीय इमारतींचे लोकार्पण झालेले आहे.आज दि.२२ रोजी तालुक्यामधिल धावरी थेरबन किनी पाळज ते राज्यसीमा रस्त्याची रुंदिकरणासह सी.सी.रस्त्यासह सुधारणा करणे,सावरगांव माळ ते देवठाणा रस्त्यावर ०/०० ते ४/०० लहान पुलांचे बांधकाम ,तालुका सीमा आमठाना पाळज दिवशी रस्ता प्राजिमा-११ रस्त्याची सुधारणा करणे,मौ.रावणगांव ता.भोकर येथे सभागृहाचे बांधकाम करणे,नांदायला(म्है.प.) ते रावणगांव मार्गावर लहान पुलाचे व रस्त्याचे बांधकाम करणे,सावरगांवमाळ आरोग्य उपकेंद्र,पाळज येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे व पशु वैद्यकीय दवाखाण्याचे बांधकामाचा शुभारंभ व मौजे रावणगांव येथे ग्रामपंचायतीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
दुपारी २ वाजता सावरगावमाळ येथे आरोग्य उपकेंद्र, दुपारी ३ वाजता पाळज येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे व पशुवैद्यकिय दवाखान्याचे भूमिपूजन होईल. सायंकाळी ५ वाजता रावणगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. धावरी,थेरबन, किनी,पाळज, ते राज्यसीमा रस्त्याचे रुंदीकरणासह सी.सी.रस्त्यासह सुधारणा करणे, सावरगावमाळ ते देवठाणा रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे, तालुक्यातील आमठाना, पाळज, – दिवशी रस्त्याची सुधारणा करणे, रावणगाव येथे सभागृहाचे बांधकाम करणे, नांदा म्हैसा प.रावणगाव रस्त्यावर पुलांचे व रस्त्याचे बांधकाम करणे आदी विकास कामासाठी निधी मंजूर झाला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अमरनाथ राजुरकर प्रतोद विधान परिषद यांची राहणार असुन मंगाराणी आंबुलगेकर जि.प. अध्यक्ष, पद्मा रेड्डी जि.प.उपाध्यक्ष,गोविंदराव शिंदे नागेलीकर काँ.जिल्हा अध्यक्ष,जिल्हाअध्यक्ष रा.काँ हरीहरराव भोसीकर,शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोढारकर,बाळसाहेब रावणगांवकर सभापती जि.प.नांदेड,प्रकाश भोसीकर गटनेता जि.प.नांदेड, निता रावलोड सभापती पंचायत समिती भोकर,नागनाथ घिसेवाड माजी सभापती, सविता मुसळे संचालिका नां.म.सह.बँक,सुभाष पाटील किन्हाळकर जि.नियोजन समिती सदस्य,सुभाष पाटील कोळगांवकर सदस्य पंचायत समिती भोकर, सागरबाई जाधव सदस्या पंचायत समिती यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष तथा बां.स.सभापती जगदिश भोसीकर,ता.अ.रा.काँग्रेस विश्वांभर पवार, ता.अ.शिवसेना अमोल पवार,विनोद चिंचाळकर ,साहेबराव सोमेवाड,बाबुराव दंडवे,गोविंदबाबा गौड,मारोती बल्लाळकर,गणेश राठोड,शेख युसुफभाई,अँड शिवाजी कदम,खाजु ईनामदार,ताहेर बेग यांनी केले आहे.