26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeनांदेडनिवड श्रेणी प्रशिक्षण शुल्कास शिक्षकांचा विरोध

निवड श्रेणी प्रशिक्षण शुल्कास शिक्षकांचा विरोध

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबत एक शासन निर्णय निर्गमित करत प्रशिक्षणासाठी २ हजार रुपये शुल्क आकारणार असल्याचे जाहीर केले. या अन्यायी निर्णयाचा विरोध करत सदर शुल्क मागे घेण्यात यावे तसेच खाजगी संस्थाद्वारे घेण्यात येत असलेली अनावश्यक प्रशिक्षणे बंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

या शासन निर्णयात राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या १२ व २४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर मिळणा-या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण ऑनलाईन होणार आहे असे सांगण्यात आले आहे. मात्र त्यासाठी प्रत्येकी २ हजार इतके शुल्क शिक्षकांना भरावे लागणार असे नमूद आहे. वास्तविक आजवर परिषदेद्वारे घेण्यात आलेल्या कोणत्याही प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून शुल्क घेतल्या गेले नाही. खरे तर एखाद्या विषयासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाची गरज असल्यास शासनाने ते निशुल्क उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र या प्रशिक्षणासाठी शुल्क घेण्यात येणार आहे तसेच हे प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपाचे असणारा आहे त्यासाठी एवढे जास्त शुल्क आकारणे अव्यवहार्य आहे.

या सदर प्रशिक्षण शुल्क मागे घेऊन शिक्षकांना निशुल्क प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी होत आहे.याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेचे संचालक मा.एम.डी.सिह यांना निवेदन पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने पाठण्यात आले आहे. तसेच पुणे येथे झालेल्या प्रत्यक्ष भेटीमध्ये शिक्षकांना महत्वाचे प्रशिक्षण वगळता अन्य प्रशिक्षणामध्ये किमान या वर्षी तरी गुंतवू नये. मॅजिक बस व अन्य एन.जी.ओ. खाजगी संस्थांमार्फत आजकाल शिक्षकांची प्रशिक्षणे लावली जातात यात त्यांचे अध्यापनाचे अनेक दिवस वाया जातात त्यामुळे उर्वरित कालावधीत शिक्षकांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी अशी प्रशिक्षणे लावण्यात येऊ नये अशी सुद्धा मागणी चर्चेसह करण्यात आली होती. यावेळी प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरीश ससनकर सरचिटणीस, विजय भोगेकर, महिला मंच राज्याध्यक्ष अल्का ठाकरे, जी.एस.मंगनाळे, नारायण कांबळे, एस.के.पाटील, बाबुराव माडगे, सुनीता इटनकर यांची प्रामुख्याने उपास्थिती होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या