18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडन.पं.च्या ओबीसी वॉर्डातील निवडणुकीला ब्रेक

न.पं.च्या ओबीसी वॉर्डातील निवडणुकीला ब्रेक

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने दाखल झालेल्या विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी करुन ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अद्यादेशाला स्थगिती दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करीत राज्य निवडणूक आयोगाने दि. ७ डिसेंबर रोजी तातडीने परिपत्रक काढून होवू घातलेल्या नगरपंचायतीच्या ओबीसी वॉर्डातील निवडणुकीला ब्रेक लावला आहे. याचा परिणाम माहूर, नायगाव व अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीवर झाला आहे.

मागील काही दिवसापासून ओबीसी आरक्षणाचा विषय चर्चेत आला आहे. आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने नगर पंचायती निवडणुकीत ओबीसी प्रवर्गास आरक्षण देण्याचा राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशास दि. ७ डिसेंबर रोजी स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे राज्यात होवू घातलेल्या नगर पंचायतच्या ओबीसी वार्डातील निवडणुकीला ब्रेक लागला आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगास ओबीसी वार्ड वगळून निवडणुकीमधील अनु.जाती, अनु. जमाती व सर्वसाधारण जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरु ठेवून ती पूर्ण करण्यास अनुमती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया जिल्हास्तरावर स्थानिक प्रशासनाने पारपाडावी असे परिपत्रक राजय निवडणूक आयोगाने तातडीने जारी केले आहे.

सर्वोच न्यायालयाने दिलेल्या या स्थगिती आदेशामुळे राजयातील अन्य जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यातील माहूर, नायगाव, अर्धापूर येथील नगर पंचायतच्या ओबीसी वार्डातील निवडणूक स्थगित झाली आहे. माहूर नगर पंचायतमधील १७ वार्डापैकी १३ वार्डात निवडणूक होणार असून ओबीसीचे ४ वार्ड वगळण्यात आले आहेत. नायगाव नगर पंचायतीच्या १४ वार्डापैकी ओबीसीचे ३ वार्ड व अर्धापूर नगर पंचायतीमधील १७ वार्डापैकी ओबीसींच्या ४ वार्डातील निवडणूक तुर्त स्थगित झाली आहे. निवडणूक ज्या टप्प्यावर स्थगित झाली आहे त्या संबंधीचा अहवाल राज्य शासनेने कारवाई करुन तो राज्य निवडणूक आयोगास सादर करावा या पुढे स्थगित वार्डाच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कारवाई करण्याबाबत जिल्हा प्रशासनास कळविण्यात येईल असेही निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी आपल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील माहूर, नायगाव, अर्धापूर या तीन नगर पंचायतसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. एवढेच नव्हे तर दि. ७ डिसेंबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता तर दि. २१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गातील अनेकांनी तयारी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इच्छूकांच्या तयारीवर पाणी पडले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या