29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडपंचायत समितीचे गोडाऊन फोडून शेगड्यांची चोरी

पंचायत समितीचे गोडाऊन फोडून शेगड्यांची चोरी

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
मुखेडच्या पंचायत समिती गोडाऊनमधून इंदीरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी ठेवलेल्या १९ हजार रुपये किंमतीच्या १९ शेगड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागच्या काहि दिवसापासुन जिल्ह्यात चो-यांचे सत्र सुरूच आहे. दिवसभरात किमान दोन चार चोरीच्या घटनांची नोंद पोलिस ठाण्यात होत आहे. चोरट्यांना कुठलेही पोलिसांचे भय राहिले नाही. दिवसाढवळ्याही चोरटे चोरीच्या घटना करत फिरत आहे. चोरट्यांनी तर आता चक्क शासकीय कार्यालयांना टार्गेट केले असुन शासकीय योजनेत वाटप करण्यात येणा-या शेगड्या चोरून नेल्या आहेत. पंचायत समिती मुखेडचे कनिष्ठ लिपीक संतोष बाबूराव मठपत्ती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ७ जानेवारी ते १० जानेवारी २०२२ च्या दुपारी ३ वाजेच्यादरम्यान पंचायत समिती मुखेडचे गोडाऊन कोणी तरी चोरट्यांनी तोडले.

त्यात सन २०१४-१५ मधील इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप करणयासाठी ठेवलेल्या १९ शेगड्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. या शेगड्यांची किंमत १९ हजार रुपये आहे. चोरट्यांनी शासकीय कार्यालयात चोरी करून पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. तालुक्यात लहान मोठ्या चो-यांचे सत्र सुरू असताना आता या चोरीने आणखी त्यात भर घातली आहे. दरम्यान या प्रकरणी मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या