26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeनांदेडपुन्हा लॉकडाऊन नको असेल तर सावध व्हावे : डॉ. वैद्य

पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर सावध व्हावे : डॉ. वैद्य

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
कोरोना आणि संभाव्य लॉकडाऊन टाळण्यासाठी सर्वांनीच साधव होऊन कुटूंबात शंभरटक्के कोरोना रोग प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. प्रत्येकानी मास्क,सॅनिटायझरचा वापर करावा. शासनाचे सर्व निर्बंध काटेकोरपणे पाळावेत.असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तज्ञ डॉ.हंसराज वैद्य यांनी नागरिकांना कले आहे.

आज घडीला प्रगत राष्ट्रांची कोरोना महामारीने केलेली भयावह परिस्थिती लक्षात घेता भारतासारख्या देशाला व जनतेला ती न परवडणारी आहे. भारतातील कोरोना संसगार्ची आकडेवारी पाहिली तर कोरोना संसर्ग अजुन पूर्णत: संपलेला नाहीच उलट वाढतो आहे असे चित्र दिसते. पुढील दोन ते तीन महिने कोरोना संसगार्ला पोषक असे वातावरण आहे. भारतातील लोकसंख्येची घनता,येथील चालीरिती, परंपरा, उत्सव प्रियता, गरिबी, अज्ञान, अंध:श्रद्धा, जनतेची रोगप्रतिबंधक लसीकरणा विषयाची कमालीची उदासिनता या सर्व गोष्टी कोरोना संसर्ग वाढीला अत्यंत पोषक बाबी आहेत. भारतामध्ये कोरोना संसगार्चे प्रमाण कमी झालेले होते. काही राज्यांनी बर्याच जिल्ह्यात कोरोना मुक्तीची घोषणा पण केलेली होती. त्यामुळे आपण उत्सवप्रिय पुढारी व जनता बेभानपणे लग्न सोहळे, मुंजी, शाल-अंगठी, डोहाळे जेवन, अनेक प्रासंगिक कार्यक्रम ,सभा,मोर्चे धर्ने,जन्मोत्सव व सनादी कार्यक्रम बिंधास्तपणे गर्दी करून साजरे करत सुटलो आहोत असेच चित्र पाहवयास मिळत आहे. कोरोनाची जागतिक आकडेवारी गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढतच असल्याचे दिसते आहे.

यामुळेच देशातील कांही शहरामध्ये पुन्हा लॉक डॉऊन घोषित केले जात आहे.
यावरून देशातील कोरोना संकट पूर्णपणे टळलेले नाही हे उघडसत्य आहे. सर्व जनतेने अतिदक्ष राहणेच उचित राहणार आहे. यासाठी प्रथम सर्वांनीच कुटूंबात शंभरटक्के कोरोना रोग प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. प्रत्येकानी मास्क,सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतराचे राखून शासनाचे सर्व निर्बंध काटेकोरपणे पाळावेत.माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे आचरणात आचरणात आणावे.स्वत: होऊन निर्भिडपणे त्वरित वैद्यकीय तपासणी करून वेळीच उपचार करावेत.हे सर्व केले तरच भारतात संभाव्य तिसरी लाट तथा पुन्हा लॉकडाऊनची वेळ सहज टाळता येईल असे डॉ.हंसराज वैद्य यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या