22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडबगायत क्षेत्राला २५ हजार रुपये वाढवून द्या

बगायत क्षेत्राला २५ हजार रुपये वाढवून द्या

एकमत ऑनलाईन

लोहा : शासनाने अतिवृष्टीचे अनुदान बगायत क्षेत्राला २५ हजार रुपये असे वाढवून द्यावे असे शेतकरी मित्र माजी सरपंच साहेबराव काळे यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना शेतकरी मित्र साहेबराव काळे म्हणाले की लोहा तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या सर्वच पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिवृष्टीचे अनुदान हेक्टरी १३६०० रुपये जाहीर केले आहे.

परंतु हे अनुदान बागायतदार शेतीसाठी तटपुंजे असुन बागायत शेतीला खर्च जास्त येतो तसेच तिच्या बेईनामा करायला ही जास्त येत असुन एकरी ५० हजार रुपये येतो तसेच लिंबोटी धरणामुळे लोहा तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली आली आहे . बागायती शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान असे वाढवून द्यावे असे शेतकरी मित्र साहेबराव काळे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या