29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडबोगस बॉयोडिझेल: एलसीबीची मुंबईत कारवाई

बोगस बॉयोडिझेल: एलसीबीची मुंबईत कारवाई

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
बोगस बॉयोडिझेल रॅकेट विरूद्ध राज्यात कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. लोहयातील एका गुन्हाचा उलघडा करित नांदेडच्या एलसीबीने थेट मुंबईत कारवाई करित ऑईल कंपनीच्या दोन संचालकांना अटक केली आहे.बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

मागील काही महिन्यापासून बोगस बॉयोडिझेलची शहर परिसरासह ग्रामीण भागात मोठया प्रमाणात विक्री केली जात आहे.याबाबत जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षकांकडे अनेक तक्रारी झाल्यानंतर कारवाई सुरू झाली आहे.नांदेड शहरासह लोहा येथे पोलिसांनी कारवाई करून बोगस बॉयोडिझेलसह काही आरोपी पकडले होते.या प्रकरणातील तपासादरम्यान राज्यातच याचे रॅकेट असल्याचे पुढे आले.

यामुळे कारवाईचे सत्र सुरू झाले.लोहयाच्या प्रकरणात मिळालेल्या माहितीनूसार नांदेडच्या एससीबीचे पोनि.व्दारकादास चिखलीकर यांच्या पथकाने थेट मुंबईतील हायड्रोल्युब इम्पेक्स कंपनीवर धाड टाकुन येथील संचालक शरद रस्तोगी व सतिषचंद्र मोरे या दोघांना अटक केली आहे.या कंपनीकडून अनेक दिवसापासून इंडस्ट्रीईल ऑईल,हॉयड्रोक्लॉईल व मरिन ऑईलची बोगस बॉयोडिझेल म्हणून विक्री जात होती.येथुनच लोहा येथे हे बॉयोडिझेल पाठविण्यात आले होते अशी माहिती पुढे आली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एलसीबीने या दोघांना बुधवारी मुंबई येथुन नांदेडात आणल्यानंतर दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी न्या.एम.बीक़ुलकर्णी यांनी या दोन कंपनी संचालकांना तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहेक़ोठडीतील चौकशी दरम्यान या रॅॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहे.हा गोरखधंदा राज्यात किती ठिकाणी चालतो.नांदेड शहरासह जिल्हयातील कोणते मासे यात अडकले आहेत,याचा उलघडा होणार आहे. बोगस बॉयोडिझेल चालविणा-या रॅकेट विरूद्ध कारवाईचे सत्र सुरू झाल्याने यात गुंतलेल्या नांदेडमधील अनेकांचे धाबे दणाणले
आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या