29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeनांदेडभारत जोडो यात्रेसाठी नांदेडचे नियोजन असेल

भारत जोडो यात्रेसाठी नांदेडचे नियोजन असेल

एकमत ऑनलाईन

नांदेड : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सदर यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात नांदेड जिल्ह्यात येणार असून या यात्रेसाठी देशातील सर्वात चांगले नियोजन नांदेडचे असेल असा विश्वास माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर राज्य शासनाने वंदे मातरम्साठी केलेली सक्ती चुकीची आहे असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

काँगे्रसच्या भारत जोडो यात्रेनिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी काँगे्रस पदाधिका-यांचे वरिष्ठ शिष्टमंडळ रविवारी नांदेड जिल्हा दौ-यावर आले आहे. या अनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरिअल सभागृहात यात्रा आढावा संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परीषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष नेटा डिसूजा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यासह काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना थोरात म्हणाले की देशामध्ये सध्या समाजासमाजात तेढ निर्माण केल्या जात आहे. बेरोजगारी, महागाईने सर्वसामान्य त्रस्त असताना याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. याकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी ही भारत जोडो यात्रा काढण्यात येत आहे. सोबतच हुकूमशाहीकडे जाणा-या भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याचा काँग्रेसचा यातून प्रयत्न आहे. तर वंदे मातरम, जय भारत हे काँग्रसने पहिल्यांदा आणले, त्यावेळेस आरएसएस हे मान्य करायला तयार नव्हती अशी परीस्थिती होती.

आता मात्र वंदे मातरमसाठी शासकीय अधिकारी, कर्मचा-यांना सक्ती करण्यात येत आहे. यास आमचा विरोध नाही, वंदे मातरम म्हणायला काही हरकत नाही, पण त्याची सक्ती करणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपण भाजपमध्ये जात असल्याच्या अफवा अजूनही थांबल्या नाहीत. यामुळे आता मी या अफवांवर वारंवार स्पष्टीकरण देणार नाही, असे म्हणाले.

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या