29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडभिलवंडे यांचे आरोप बिनबुडाचे: भोसीकर

भिलवंडे यांचे आरोप बिनबुडाचे: भोसीकर

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नायगाव तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांनी दि. १२ रोजी पत्रकार परीषदेत आपल्यावर केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून पक्षविरोधी कारवायामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची पदावरून हकापटी केले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी दिली. ते शुक्रवारी नांदेड येथील आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.

भिलवंडे यांनी पत्रकार परीषद घेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याला उत्तर म्हणून भोसीकर यांनी शुक्रवार दि.१४ रोजी आपल्या कार्यालयात पत्रकार परीषद घेत या सर्व आरोपाचे खंडण केले. यावेळी भोसीकर पुढे बोलताना म्हणाले की, भिलवंडे हे मागच्या काहि दिवसापासून पक्षविरोधी कार्यवाह्या करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत पक्षहीताचे एकही काम केले नाही. मी जिल्हाध्यक्ष झाल्यावर प्रदेशाध्यक्षकांनी पुर्वीची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याच्या सुचना दिल्या असतानाही त्यांना तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. मात्र त्यांना एकही लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकाळात निवडून आणता आला नाही. उलट त्यांनी मागच्या काळात काँग्रेसशी जवळीकता साधत काँग्रेस सोबत तडजोड सुरू असल्याचे सिद्ध केले. तसेच नायगाव नगर पंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने नांदेड येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीत आपण सदर निवडणूकीसाठी एक रूपयाही खर्च करणार नसल्याचे सांगीतले होते आता मात्र आपण पक्षासाठी खर्च करीत असल्याच्या ते खोट्या बतावण्या करीत आहेत. तसेच या निवडणुकीपासुन त्यांनी सतत स्वत:ला दुर ठेवले हे सर्वांना माहित आहे.तसेच भिलवंडे यांनी नेहमीच तडजोडीचे राजकारण केले.

नायगाव करांच्या भितीने ते या निवडणूकीत दिसले नाहीत. या निवडणूकीत त्यांनी केवळ पक्षाच्या पदाधिका-यावर केवळ आरोपक करून आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या तालूक्यात त्यांनी एकाच नर्सी गटातून तीन लोकांना जिल्हा कार्यकारणीमध्ये घेवुन एकाच ठिकाणी प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला. असे भोसीकर यावेळी म्हणाले. तसेच पुढे बोेलताना ते म्हणाले की, भिलवंडे यांनी आपण जिल्हाअध्य क्ष पदाची मागणी केल्यामुळे आपल्यावर सदर कार्यकाही केल्याचा आरोप केला जे की चुकीचे असुन पक्षातील प्रत्येकाला पद मागण्याचा अधिकार आहे. मात्र भिलवंडे यांची जिल्हाध्यक्ष होण्याची पात्रता नसल्यामुळे त्यांना हे पद देण्यात आले नाही. याची खंत म्हणून ते आपल्यावर खोटे आरोप करीत आहेत. आजपर्यंत भीलवंडे यांनी काहि मोजक्या लोकांना हाताशी धरून सोशल मिडीयावर आपण काम करीत असल्याचा वाव आणत असून त्यांना त्यांच्या नर्सी गावात साधे ग्रामपंचायतचे पॅनलही निवडून आणता आले नाही असे भोसीकर म्हणाले. यावेळी आयोजित पत्रकह्यार परीषदेत राष्ट्रवादीचे डी.बी.जांभूरकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, चंद्रकांत टेकाळे आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या