27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeनांदेडभीषण आगीत दोन दुकाने जळून खाक

भीषण आगीत दोन दुकाने जळून खाक

एकमत ऑनलाईन

नांदेड : नवीन मोंढा भागात लागलेल्या भीषण आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. ही घटना आज दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. चार ते पाच तासानंतर आग आटोक्यात आली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले.

शहरातील नवीन मोंढा भागात स्वाती विवेक चिद्रावार यांचे विवेक एजन्सी व संगीता सुनील राखे यांचे मंगलम ट्रेडर्स नावाचे टिन शेडमध्ये दुकाने होती. आज दि. २ रोजी रात्री १२.०५ च्या सुमारास अचानक या दुकानांना आग लागली. काही वेळातच आग दोन्ही बाजूने पसरत गेली. यामुळे पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. यात दोन्ही दुकानातील ठिबकचे बंडल, स्प्रिंकलर, तुषार पाईप, पाईप, ताडपत्री, नळ फिटींग पाईप, नायलॉन दोरी, नारळाची रस्सी, पत्रवाळी, द्रोण आदी प्लास्टिक साहित्याने भडका उडाला.

आग जास्तच पसरत असल्यामुळे एमआयडीसीचे अग्निशमन बंब मदतीसाठी बोलविण्यात आले. मनपाचे जेसीबी व पाण्याचे टँकर घटनास्थळी मागविण्यात आले. तब्बल चार ते पाच तासांच्या कसरतीनंतर अग्निशमन दलाने मनपाच्या ३, एमआयडीसीचे १ असे ४ बंब व पोर्टेबल पंपाच्या साह्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या