नांदेड : प्रतिनिधी
महाविकास आघाडीची जाहिर सभा दि. २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या सभेस माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातून महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे २५ हजार कार्यकर्ते जाहिर सभेसाठी उपस्थित राहतील, असा निर्धार दि. २९ रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीत करण्यात आला.
प्रगती महिला मंडळामध्ये ही आढावा बैठक झाली. बैठकीस माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, शिवसेनानेते माजी खा. चंद्रकांत खैरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आ. अमरनाथ राजुरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात, माजी खा. सुभाष वानखेडे, आ. मोहणअण्णा हंबर्डे, आ. जितेश अंतापुरकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन,
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शहराध्यक्ष डॉ. सुनिल कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, दत्ता कोकाटे, माधव पावडे, शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, मनोज भंडारी, महानगरप्रमुख पप्पु जाधव, राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी.बी. जांबरुणकर, विक्रम देशमुख, माजी महापौर सौ. मंगलाताई निमकर, जयश्रीताई पावडे, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेसच्या वरिष्ठ जिल्हाउपाध्यक्षा डॉ. मिनलताई खतगावकर, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, ज्योतीबा खराटे, आदिंची या बैठकीस उपस्थिती होती.
सध्या देशात आणि राज्यात सत्तेत असलेले भारतिय जनता पक्षाचे सरकार लोकशाहीच्या मुळावर उठले आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासाठी षडयंत्र रचले या वरुन विरोधकांना संपविण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरु आहे, हे सिद्ध होते. या सरकारमध्ये सामान्य नागरिकांची गळचेपी होत आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना फोडण्याचे भाजपाने पाप केले आहे. या बद्दल सामान्य माणसांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन्ही घटक पक्षांनी एकत्रीत येऊन लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच भाग म्हणून महाविकास आघाडीच्या विभागवार संयुक्तसभा होत आहेत असे यावेळी सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणांतून सांगितले.