24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeनांदेडमहामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी रेल्वेस्थानक परिसरातील पुर्णकृती पुतळयास जनसमुदायाकडून विनम्र अभिवादन करण्यात आले. सोमवारी भल्या पहाटेपासून हजारो आंबेडकरी अनुयायांसह विविध पक्ष,संघटनांची अभिवादनासाठी रिघ सुरू होतीक़ोरोनाच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करित शासनाच्या आवाहनास अनुयायांनी प्रतिसाद दिला.

कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवीन विषाणू आढळून आला आहे. सद्यस्थितीत सगळीकडे या संसगार्चा धोका निर्माण झाल्याने सध्या कोणत्याही प्रकारचे गर्दी होणारे कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. ओमिक्रॉन विषाणुच्या पार्श्वभूमीवर या संक्रमण रोगाचा प्रभाव पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादरसह इतर ठिकाणच्या कार्यक्रमाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व आंबेडकरी अनुयायांनी गर्दी न करता करावा.विषेशत:मुंबई येथे न येता घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन शासनाने केले होते. यास प्रतिसाद देत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांदेड शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील पुर्णाकृती पुतळयास विन्रम अभिवादन केले.
सोमवार दि.६ डिसेंबर रोजी भल्या पहाटेपासूनच पुतळा परिसरात अभिवादनासाठी रिघ लागली होती.आंबेडकरी अनुयायांसह त्यांच्या विचारांना मानणा-या विविध पक्ष,संघटनाकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.तर आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी,जलसा आदी कृती शील कार्यक्रमांनी ही अभिवादन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करत अनेक अनुयायांनी घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनानिमित्त रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी असते. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे ही गर्दी दिसून आली नाही. रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये विविध संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होवून युवकांनी रक्तदानाद्वारे डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
काँगे्रसकडून अभिवादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर काँगे्रसकडून अभिवादन करण्यात आले.यावेळी आ.अमर राजूरकर,आ.मोहन हंबर्डे,माजी मंत्री डि.पी.सावंत,विजय येवनकर आदी उपस्थित होते. शिवसेनेतर्फे अभिवादन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, आनंदराव बोंढारकर, उमेश मुंडे, जयवंत कदम, अशोक पावडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

भाजपचे रक्तदान शिबीर
रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणार्कृती पुतळ्याजवळ भाजप महानगरतर्फे अभिवादन केले. यानंतर रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रवीण साले, अ‍ॅड. दिलीप ठाकूर, आरती पुरंदरे, कुणाल गजभारे,नगरसेवक वैशाली देशमुख,शितल भालके आदी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अभिवादन करण्यात आले. प्रवक्ते यावेळी फारूक अहमद, जिल्हा महासचिव शाम कांबळे, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महानगर महासचिव अमृत नरंगलकर, विनायक गजभारे, अड. कमलेश चौदंते, सुदर्शन कांचनगिरे, संजय टिके, डॉ, रामचंद्र वनंजे आदी उपस्थित होते.

प्रजासत्ताक पक्ष महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रजासताक पक्षाकडून अभिवादन झाले.यावेळी सुरेश गायकवाड, देविदास मनोहरे, डी. पी. गायकवाड, पी. एस. गवळे, जे. डी. कवडे, रवी गायकवाड, शीलरत्न चावरे, शंकरराव एडगे, भगवान गायकवाड, नंदु बनसोडे, पंडीत
आढाव,एम.जी बादलगावकर,किशोर अटकोरे आदी उपस्थित
होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या