18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडमारेकरी बापासह मामा पोलिस कोठडीत

मारेकरी बापासह मामा पोलिस कोठडीत

एकमत ऑनलाईन

मुक्रमाबाद: प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील हासनाळ(प.मु.) येथे प्रेम संबंधामुळे संतप्त झालेल्या युवतीच्या बापाने प्रियकराचा तिच्या मामाच्या मदतीने खून करुन मृतदेह खडयात पुरला होता. या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही दि.१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुखेड तालुक्यातील हसनाळ (प.मु.) येथील असून चार महिन्यापुर्वी सुर्यकांत नागनाथ जाधव (२२ ) या युवकाचे प्रेमसबंघ गावातच असलेल्या नातलगातील मुलीशी जुळले होते. सदरील प्रेमसबंधाची कुणकुण मुलीच्या वडीलाला लागली असल्याचे प्रियकर सुर्यकांत जाधव याला समजताच भितीमुळे त्याने गाव सोडले होते. मात्र चार महिण्यानंतर सुर्यकांत गावाकडे येत असल्याची माहीती मुलीच्या वडीलाला मिळताच रस्त्यातच सुर्यकांत जाधव याला गाठून त्याचा खून केला व मृतदेह खोल खड्डा करुन रावणगाव शिवारातील शेतात पुरुन पुरावा नष्ट केला.

सुर्यकांत जाधव घराकडे आला नाही व त्याचा फोनही लागत नसल्याने भाऊ रवीकांत जाधव यांनी सर्वत्र शोध घेत मुक्रमाबाद पोलीसात तक्रार दाखल केली. सपोनि संग्राम जाधव, पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे व गजानन कांगणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी माधव सोपान थोटवे रा. हसनाळ (प.मु.) व पंढरी गवलवाड या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.या आरोपींना मुखेड कोर्टासमोर हजर केले असता १ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. चौकशी दरम्यान रविवार दि.२८ रोजी सायंकाळी ४ वाजता आरोपीसह पोलीस घटनास्थळी जाऊन पुरलेला मृतदेह बाहेर काढला व जाग्यावरच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी नायब तहसिलदार महेश हांडे, देगलुचे स.पो.नि. कमलाकर गड्डीमे, तलाठी कदम हे ऊपस्थीत होते. पुढील तपास स.पो.नि.संग्राम जाधव हे करत आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या