नांदेड : चार आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्राच्या आधारे ते खरे असल्याचे भासवून विकसन करारनामा करून मालमत्ता हडप करण्याचा प्रयतन करत एकाची फसवणूक केल्याची घटना दुय्यम निबंधक कार्यालयात उघड झाली़ या प्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील काबरानगर भागात राहणारे रमेश व्यंकागौड कैसरे यांनी मागच्या दोन वर्षापूर्वी आरोपीसोबत जमिन मालमत्ता संबंकधी व्यवहार केले होते़ मात्र चार आरोपींनी त्यांचा विश्वासघात करत बनावट कागदपत्राच्या आधारे ते खरे आहेत असे भासवून विकसन करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणह करून रमेश कैसरे यांची फसवणूक करत मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला.
अखेर त्यांना सदर बाब निदर्शनास आल्याने त्यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली़ त्यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोनि नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.