18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडमाळेगाव यात्रा पुन्हा संकटात

माळेगाव यात्रा पुन्हा संकटात

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे.यामुळे दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा पुन्हा संकटात सापडली आहे.जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्व साधारण सभेत सदस्यांनी यात्रेचा मुद्दा उपस्थित केला.त्यावर शासन,जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सीईओंनी सांगीतले. तर सध्या पदावर असलेल्या सर्व पदाधिका-यांचा कार्यकाळ लवकरच संपत असल्याने पदाधिकारी चिंतेत दिसून आले.

गेल्या तीन चार महिन्यात कोरोनाचा तीव्रता कमी आहे.यामुळे शासनाने देैनंदिन व्यवहार व बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी शिथीलता देत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन पाळण्याचे बंधन घातले आहे.अधिक वेगाने पसरणा-या या विषाणुचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. त्यानंतर जगभरातील अन्य काही देशांतील नागरिकांना या विषाणुची लागण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एक प्रवासीही पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकारनेही प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने शासनाने दिलेल्या सुचनांनूसार जिल्हा परिषदेत सोमवारी जि.प.अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व साधारण सभा घेण्यात आली.या सभेच्या सुरूवातीलाच दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा कोरोनाचे नियम पाळून भरविण्यात यावी अशी मागणी चंद्रसेन पाटील यांनी केली.यावर माळेगाव यात्रा संबधी राज्यशासन व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे सीईओ वर्षा ठाकूर तर यात्रा घेण्यासाठी प्रयत्न करु असे जि.प.च्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर सांगीतले.तर मानक-यांना ५१ हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. जि.प. सदस्य प्रश्न उपस्थित केल्यास अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, पदाधिकारी मूग गिळून गप्प बसतात.हा कारभार बंद करावी,अशी अशी मागणी सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांनी लावून धरली. नांदेड पंचायत समितीत शेतक-यांचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागावेत अशी मागणी साहेबराव धनगे केली.तर पापाचे काम होतात, पुण्याचे काम करा अयस टोला कॉगे्रसचे गटनेते प्रकाश पाटील भोसीकर यांनी लगावत, ग्रामपंचायतीच्या वसुलीला प्राधान्य द्यावे.

ग्रामसेवकांना यासाठी सक्ती करावी असे सांगीतले. ग्रामसेवक तीन ना हरकत प्रमाणपत्र दिले असा आरोप समाधान जाधव यांनी केला. जि.प.च्या सर्व साधारण सभेस अनेक सदस्यांची दांडी मारली तर सध्या पदावर असलेल्या सर्वच पदाधिका-यांची लवकरच मुदत संपत असल्याने पदाधिकारी चिंतेत दिसून आले. दरम्यान गेल्या काही महिन्यापासून स्थायी समितीवरील सदस्यांच्या रिक्तजागा भरण्यास टाळाटाळ होत आहे. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी मागच्या सभेत सदस्यांची नियुक्ती करण्याचा शब्द दिला होता तोही पाळण्यात आला नाही यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. नियमबा पदोन्नती, सदस्यांच्या प्रलंबित कामांना अधिका प्रतिसाद न मिळणे, निधीचे वाटप,रोजगार हमीच्या कामासंदर्भात अनियमितता आदी विषयावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली.

दरम्यान कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकाराने सर्वाची चिंता वाढवली आहे. अधिक वेगाने पसरणा-या या विषाणुचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एक प्रवासीही पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकारनेही प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी आणि नागरिकांनी ही नियम काटेकोर नियम पाळावेत अशा सक्त सुचना दिल्या आहेतक़ोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकारामुळे माळेगाव यात्रा पुन्हा संकटात सापडली आहे. या सभेस शिक्षण सभापती संजय बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सुशिला बेटमोगरेकर, मुखय कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्यासह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित
होते.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या