23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडमित्तलनगर भागात दोघांवर खंजरने हल्ला

मित्तलनगर भागात दोघांवर खंजरने हल्ला

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे़ दररोज मारहाण, लूटमार, जबरी चोरी, शस्त्राच्या जोरावर धमकावने असे प्रकार घडत आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मित्तलनगर येथेही दोघां भावंडावर आरोपीने संगनमत करून खंजर व तलवारीने हल्ला केला. ज्यात एकजन गंभीर जखमी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवसेंदिवस शहर व परीसरात गुन्हेगारी वाढत चालली आहे़ किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतरही सशस्त्र भांडणात होत आहे़ अगदी माफक दरात कुठेही शस्त्र मिळू लागल्याने तलवार, खंजर, गावठी पिस्टलचा सुळसुळाट झाला आहे.

किरकोळ भांडण झाले तरी सदर भांडणात सर्रासपणे खंजर, तलवारी सारखे शस्त्र वापरले जात आहेत. दरम्यान ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मित्तलनगर भागात गाडेगाव रोडवर दोघा भावंडावर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. दि़ २७ जूलै रोजी फिर्यादी शेख गफार शेख मुक्रम व त्यांचा भाऊ हे दोघेजन घरासमोर उभे असताना, दोन दिवसापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून त्या दोघांभावंडासोबत वाद घातला. पुढे त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींना दोघांनाही तलवारीने मारहाण केली.

तसेच शेख गफार यांच्या भावाच्या पोटात खंजरने वार करून त्यास गंभीर जखमी केले़ त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देवून आरोपी तिथून निघून गेले़ या प्रकरणी शेख गफार शेख मुक्रम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि माने हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या