24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडमुखेड बाजार समितीच्या सत्तेसाठी आजी-माजी आमदारांत रस्सीखेच

मुखेड बाजार समितीच्या सत्तेसाठी आजी-माजी आमदारांत रस्सीखेच

एकमत ऑनलाईन

 

नांदेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे भाजप आ़ डॉ़ तुषार राठोड यांनी आणखी मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ तर येत्या आठ दिवसाच्या आत बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्त होईल अशी माहिती काँग्रेसचे माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर यांनी दिली. यामुळे बाजार समितीच्या सत्तेसाठी आजी माजी आमदारांत रस्स्ीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे़
येथील बाजार समितीवर आ़ डॉ. तुषार राठोड यांची एक हाती सत्ता असून सभापती खुशाल पाटील यांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष बाजार समितीचा कारभार करण्यात आला.

दरम्यानच्या काळात वाढत्या तक्रारीमुळे सभापतींचे काही अधिकार काढून एका संचालकांना दिल्यामुळे सभापती हे रबरी शिक्का बनून गेले असल्याची चर्चा होती. दरम्यान असे असले तरीही आमदारांनी बाजार समितीवर पुन्हा आपलेच वर्चस्व रहावे यासाठी सहकार मंत्र्याकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे़ मागील काही दिवसापासून होत असलेल्या राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकांमध्ये मंत्रीमडळाचे सचिव व मंत्रीमहोदय निवडणूक प्रक्रीयेमध्ये व्यस्त असल्याने मुदतवाढ की प्रशासक मंडळ यांचा अंतिम निर्णय झाला नाही. याचा काय निर्णय होते याकडे राजकीय मंडळी व शेतक-यांत चर्चा केली जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पाच वर्षात शेतक-यांच्या हितासाठी कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत. बाजार समितीच्या आवारात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संरक्षक भिंतीचे काम करण्यात येणार असून इमारतीचीही दुरूस्ती व रंगरंगोटी करण्यात येणार आहे. त्याच बरोबरीने बाजार समितीच्या अंतर्गत रस्त्याची दुरवस्था व शेतक-यांच्या वाहनांना होत असलेल्या अडचणी पाहता नविन रस्ते बांधणीसाठी सुमारे ३५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच निविदा प्रक्रीया पूर्ण करून कामाची सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बेटमोगरेकर यांनी दिली. यावेळी बाजार समितीचे संचालक सदाशिव पाटील जाधव, बालाजी पाटील गुट्टे, नंदकुमार मडगुलवार, अशोकसेठ जाजू, विशाल गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या