24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeनांदेडमुलानेच केला जन्मदात्या आईचा खून

मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून

एकमत ऑनलाईन

पूर्णा : तालुक्यातील मौजे पिपरण येथे पोटच्या मुलानेच दारूच्या नशेत जन्मदात्या आईचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना बुधवार, दि़. २१ रोजी पहाटेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी आरोपी मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ पूर्णा येथे काल एका २० वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळल्यानंतर आज ही घटना घडल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्णा शहरातील रेल्वे परिसरातील तडीपार परीसरात काल मंगळवारी एका अज्ञात तरुणीची मृतदेह आढळून आला होता़ ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील मौजे पिंपरण येथे बुधवारी पहाटे एका वृध्द महिलेचा खून झाल्याची माहिती चुडावा पोलिस ठाण्याचे सपोनि़शिवप्रकाश मुळे यांना मिळाली.

त्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करीत तपासचक्रे फिरवली असता सदर वृद्ध महिलेचे नाव सुलचनाबाई शंकर सोनटक्के (वय ६९) असून मुलगा मारोती शंकरराव सोनटक्के यानेच दारूच्या नशेत जन्मदात्या आई सुलचनाबाई यांचा डोक्यात दगड टाकून खून केल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगा मारोती सोनटक्के यास ताब्यात घेतले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बातमी लिहेपर्यत सुरू होती. तालुक्यात लागोपाठ दोन दिवस घडलेल्या खुनाच्या घटनेने तालुक्यात खुनाचे सत्र सुरू झाले की काय अशा प्रश्न निर्माण नागरीकातून व्यक्त होत आहे़ या घटनांमुळे तालुक्यातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़र सकारात्मक राहावे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या