24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडमुसळधार पाऊस झाल्याने कापुस लागवड जोरात

मुसळधार पाऊस झाल्याने कापुस लागवड जोरात

एकमत ऑनलाईन

ईस्लापुर : ईस्लापुर, जलधारा परिसरात वादळी, वा-यासह समाधानकारक मुसळधार पाऊस झाल्याने या भागातील शेतकयांनी कापुस लागवड जोरात चालु केली आहे. उन्हाळयातील लग्न सराई आटोपताच शेतकयांनी शेतीकामा कडे लक्ष केंद्रीत करत शेतातील सर्व कामे आटोपुन जमिन पेरणी साठी सज्ज ठेवत शेतकरी वर्ग बि,बियाणे,खते,औषधी आणुन पेरणीसाठी पावसाच्या प्रतिक्षेत होता.

यातच मे महिण्याच्या शेवटला व जुन महिण्याच्या पहिल्याच आठवडयात वादळी,वायासह अधुन,मधुन अवकाळी पाऊस या भागात झाल्याने शेतकया मध्ये पेरणीसाठी घाई सुरु झाली होती. यातच काल दि ११ जुन शनिवार रोजी सायकाळच्या सुमारास ईस्लापुर,जलधारा परिसरात वादळी,वारा, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने या परिसरातील शेतकयांनी कापुस लागवड जोरात सुरु केली आहे.

या पावसाने मात्र जंगलात जनावरांना,गुरा ढोरांना व वन्य प्राण्याना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. तर परिसरातील छोटे,मोठे नाले,तलावात देखील पाणी साचले आहे. दि.१२ जुन रविवार व दि. १३ जुन सोमवार रोजी या भागातील कापुस लागवड केलेल्या शेतकयांना आता पावसाची गरज असुन शेतकयाचे डोळे आभाळाकडे लागले असुन परिसरात आभाळमय वातावरण आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या