देगलूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या अभ्यासमंडळावर २०२3 ते २०२७ कालावधीसाठी पानसरे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील सहयोगी प्रा. डॉ.रामचंद्र गायकवाड यांची माननीय कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सरांनी पाच वर्षासाठी कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे. तशा आशयाचे पत्र विद्यापीठ वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
प्रा. डॉ.रामचंद्र गायकवाड हे गेल्या वीस वर्षापासून पानसरे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाअंतर्गत सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांनीआतापर्यंत विभागीय ,राष्ट्रीय ,राज्यस्तरीय आणि, आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषद ,चर्चासत्र या माध्यमातून विविध विषयावर शोधनिबंध सादर केलेले आहेत त्यांनी वैचारिक स्वरूपाची तीन पुस्तक प्रकाशित केले आहेत ४०चा शोध निबंध युजीसी मान्यता जर्नल व मासिकातून प्रसिद्ध केले आहेत. वाचन केलेले आहेत.
त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन माननीय कुलगुरू यांनी त्यांची राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर निवड केलेली आहे या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक श्रीरामे अध्यक्ष माननीय मनोहररावजी देशपांडे , उपाध्यक्ष नागनाथराव पाटील सावळीकर ,राजेश उत्तरवार सचिव सुनील बेजगमवार ,संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दमकोंडावार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीपजी आंबेकर सर्व संचालक शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन अधीक्षक, सर्व प्राध्यापक यांनी प्रा. डॉ. रामचंद्र गायकवाड यांचे अभिनंदन केलेले आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल बिलोली ,कुडलवाडी ,देगलूर , परिसरात अभिनंदन केले जात आहे