मुक्रमाबाद /प्रतिनिधी
देगलूर ते रेणापूर राष्ट्रीय महामार्ग हा नेहमीच खड्ड्यांनी व्यापलेला आहे. हा महामार्ग दुरूस्ती करण्यासाठी संबंधित विभागाकडे रितसर मागणी केली. पृण या मागणीला नेहमीच केराची टोपली दाखविण्यात येत असल्यामुळे २१ फेब्रुवारी पर्यंत या राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अन्यथा मुक्रमाबाद येथील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर तिव्र रास्ता रोको करण्याचा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
देगलूर ते रेणापूर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून सहा वर्षापुर्वी घोषीत करण्यात आले. हा मार्ग म्हणजे मराठवाडा , तेलंगाना व आंध्रा राज्यातील व्यापा-यासाठी व नागरिकांसाठी महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे या महार्गावरून दिवस – राञ वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. पण या महामार्ग पुर्णपणे खड्यांनी व्यापलेला असल्यामुळे येथून मार्गक्रमण करणे म्हणजे एक प्रकारे मृत्यूलाच आमञंण दिल्यासारखे आहे.
या मार्गावर अपघात होणे ही, नित्याचिच बाब बनली आहे. या मुक्रमाबाद व परिसरातील नागरिकांनी या महामार्गाची दुरूस्ती करण्यासाठी संबंधित विभागाकडे प्रत्यक्षभेट घेऊन निवदने देऊन मागणी केली. पण प्रत्येकवेळी या मागाणीला पण संबंधित विभागाने या महत्त्वाच्या मागणीला केराची टोपली दाखवून गेल्या अनेक वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गावरून मार्ग क्रमन करणा-या नागरिकांच्या व वाहन धारकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळ चालविलेला आहे.