26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeनांदेडलग्नातील जेवणातून शंभर जणांना विषबाधा

लग्नातील जेवणातून शंभर जणांना विषबाधा

एकमत ऑनलाईन

कंधार : सय्यद हबीब
एका लग्न सोहळयातील जेवणातून शंभर पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. दिग्रस येथे हा लग्न सोहळा पार पडून २४ तासानंतर दुस-या दिवशी सोमवारी सायंकाळी अचानक दिग्रस प्राथमिक उपचार केंद्रात उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असलेल्या रुग्णात वाढ होऊ लागली .यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

कंधार तालुक्यातील दिग्रस (खु) गावात रविवारी २१ रोजी एक लग्न सोहळा पार पडला होता. यानंतर २४ तासानंतर म्हणजेच दुस-या दिवशी सोमवारी सायंकाळी अचानक मंडपा जवळच्या उपआरोग्य केंद्र दिग्रस येथे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असलेल्या रुग्णात वाढ होऊ लागली. जागेअभावी मंगळवारी सकाळपासूनच कंधार ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता रुग्ण दाखन झाले.तेव्हा लग्न समारंभातील जेवणातूनच ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी लग्न समारंभ स्थळी जाऊन घेतलेले सॅम्पल तपासणीसाठी पाठवले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुर्यकांत लोणीकर यांनी सांगितले.

सध्या तरी या घटनेमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या अधिपत्याखाली डॉ.अरविंद फिसके डॉ. रवी पोरे डॉ.महेश पोकले डॉ.श्रीकांत मोरे, डॉ.राठोड, डॉ.गजानन पवार, डॉ.शाहीन, डॉ.नम्रता धुने, खाजगी रुग्णालयाचे डॉ. प्रकाश सादलापुरे, डॉ. मीनाक्षी सादलापुरे, दिग्रस आरोग्य केंद्रातील डॉ.प्रविण जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे यशवंत पदरे सिस्टर वैशाली कदम, वाघमारे, कर्मचारी दुरपडे, कागणे आदीसह उपचारासाठी परिश्रम घेत आहेत दरम्यान कुठल्याही रुग्णाची प्रकृती ही धोकादायक नसून त्यांच्यावर कंधार ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून घरी पाठविण्यात येत आहे,असे आरोग्य अधिका-यांनी सांगीतले. यावेळी नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे, भोजुच्यावाडीचे सरपंच प्रतिनिधी सतीश देवकते माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड आदींनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या