18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडवजीराबाद चौकात सोलार सिग्नल सुरू

वजीराबाद चौकात सोलार सिग्नल सुरू

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
शहरात सिग्नल बंदचालु होत असल्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत होते ही बाब लक्षात घेवून नगरसेवक अमितसिंह तेहरा यांनी पुढाकार घेऊन शहरात सोलार सिस्टीमवर सिग्नल सुरु करण्यात यावे.अशी मागणी केली होती. या मागणीला यश आले असून सोमवारी वजिराबाद चौकात आ.मोहन हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, आयुक्त सुनिल लहाने यांच्या उपस्थितीत सिग्नल सुरु करण्यात आले आहे.

गेल्या अनेक अनेक दिवसापासून शहरात विविध चौकामध्ये बसवलेले सिग्नल बंद चालू नेहमीच होत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याबाबत अनेकवेळा महापालिकेकडे सोलारवर सिग्नल सुरु करण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक अमितसिंह यांनी लेखी स्वरुपात केली होती. यामागणीची दखल महापौर जयश्री पावडे यांनी तात्काळ घेतली. व सोमवारी वजिराबाद चौकात सोलार सिस्टीमवर सिग्नल मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले आहे. सदर सिग्नल सोलार सिस्टीमवर सुरु केल्यामुळे सिग्नल बंदचालु होणार नाही व अपघातही या चौकात होणार नाहीत असे मत नागरीकांनी व्यक्त केले आहे. वजिराबाद प्रमाणे शहरातील अन्य सिग्नल सोलार सिस्टीमवर सुरु करण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक अमितसिंह यांनी आपल्या निवेदनात केली आहे. या कार्यक्रमास महापालिकेचे विरोधीपक्ष नेता दीपकसिंग रावत, नगरसेवक महेश कडक दंडे, विरेंद्रसिंघ गाडीवाले, निलेश पावडे, शेरसिंघ अली, यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती व सिग्नल बसविण्यासाठी त्यांचे सहकार्य लाभले आहे.

शहरातील आयटीआय चौक, वर्कशॉप, पावडेवाडी नाका, महात्मा फुले, शेतकरी चौक अनेक ठिकाणी बसविण्यात आलेले सिग्नल सोलार सिस्टीमवर सुरु करण्यात यावेत जेनेकरुन चौकामध्ये वाहतुकीची कोंडी होणार नाही. व अपघाताचे प्रमाणही कमी होईल त्यामुळे वाहतुक पोलिसांवर येणारा ताण कमी होईल व नियमानुसार वाहतुक सुरळीत होणार आहे. वजिराबाद चौकाप्रमाणे इतर चौकातही सिग्नल सोलार सिस्टीमने जोडावेत अशी मागणी नगरसेवक अमितसिंह तेहरा यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या